आईची माया! मुलाला तुरुंगातून सोडवण्यासाठी खोदले ३५ फूट भुयार; पुढे काय झाले वाचा…

आई आपल्या मुलांवर खुप प्रेम करत असते. जन्मापासून ते मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांचा सांभाळ करत असते. आई आणि मुलांचं नातं घट्ट असतं. संकट काळात आई मुलांच्या बाजूने उभी राहत त्यांना लढण्याची नवी उर्जा देत असते. पण मुलाने चुक केल्यावर त्यांना रागवत सुध्दा असते.

आपल्या मुलांसाठी आई काहीही करायला तयार होत असते.  युक्रेनमध्ये एका आईने आपल्या मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी भन्नाट आयडिया शोधली. पण त्यामध्ये तिला यश आले नाही. उलट तिलाच जेलची हवा खायला लागली.

एका स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका खूनाच्या गुन्ह्यामध्ये ५१ वर्षीय महिलेचा मुलगा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मुलाच्या सुटकेसाठी महिलेने अनेक प्रयत्न केले. मात्र  मुलाची सुटका काही होऊ शकली नाही. अखेर तिने एक प्लॅग आखला आणि त्यानूसार तिने काम करण्यास सुरूवात केली.

मुलगा ज्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याच्या जवळच्या परिसरात महिलेने भाड्याने एक खोली घेतली. त्यानंतर रूमपासून ते जेलपर्यंत तिने भुयार खोदण्यास सुरूवात केली. महिलेकडे भुयार खोदण्यासाठी कुदळ फावडे यांसारख्या वस्तू होत्या.

महिलेचं भुयार खोदण्याचं रोज काम सुरू होतं. अवघ्या २१ दिवसामध्ये तीने ३५ फुट भुयार खोदले आणि अखेर ती जेलच्या जवळ पोहोचली. जेलच्या भींतीपर्यंत भुयार खोदल्यानंतर पोलिसांना काही तरी गडबड असल्याचं जाणवलं.

पोलिसांंनी पाहणी केली असता. त्यांना जेलच्या भींतीपासून थेट महिलेच्या घरापर्यंत भुयार खोदलं असल्याचं दिसलं.  त्यानंतर महिलेला ताब्यात घेऊन पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करत तिची रवानगी जेलमध्ये केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून आव्हाडांच्या पत्नी संतापल्या; राष्ट्रवादीच्या मदतीला मनसे धावली
कुंभमेळ्यात पॉझिटिव्ह आलेले १९ भाविक रुग्णालयातून फरार, घटनेने सर्वत्रच खळबळ
अजबच! जखमी सैनिकांना बरे करण्यासाठी केला जातोय सेक्स थेरेपीचा वापर, सरकार करतंय खर्च

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.