Danoli : १५ वर्षाच्या नम्रताने विहिरीत उडी घेत वाचवला ३ वर्षाच्या चिमुकल्याचा जीव, प्रसंग वाचून अंगावर येईल काटा

Danoli : लहान मुलांच्या धाडसाचा अनेक गोष्टी आपण नेहमीच ऐकत असतो. अशीच एक घटना दानोळी येथे घडली आहे. यामध्ये एका १५ वर्षीय मुलीने एका ३ वर्षीय लहान मुलाचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे त्या मुलीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

तीन वर्षीय भाचा खेळता खेळता विहिरीत पडला असता तिने आपल्या जीवाची पर्वा न करता त्याचे प्राण वाचवले. त्यासाठी तिने चक्क विहिरीत उडी घेतली. नम्रता कलगोंडा कटारे असे या तरुणीचे नाव आहे. तिने शौर्य नावाच्या तिच्या चिमुकल्या भाच्याचे प्राण वाचवले आहे.

त्याचे झाले असे की, दानोळी-जयसिंगपूर रस्त्यावरील शेतात कटारे कुटुंबीय राहतात. शौर्य आणि त्याचा मोठा भाऊ ओजस हे अंगणात खेळत होते. खेळता खेळता ते विहिरीजवळ गेले आणि शौर्य विहिरीत पडला. ते पाहून ओजस जोरात ओरडू लागला.

ओजसचा आवाज ऐकताच नम्रता बाहेर आली. शौर्य विहिरीत बुडत असल्याचे नम्रताला कळताच कुठलाही विचार न करता तिने सरळ विहिरीत उडी घेतली. नम्रताने शौर्यला सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. तिने दाखवलेल्या प्रसंगावधानाने चिमुकल्या शौर्यचे प्राण वाचले.

विशेष म्हणजे नम्रता नुकतीच पोहायला शिकली होती. पण तिचा फारसा सराव नव्हता. असे असूनही तिने विहिरीत उडी घेण्याची हिंमत केली. तिच्या धाडसामुळे शौर्यचे प्राण वाचले. नम्रताच्या या धाडसामुळे सर्वच स्तरावर तिचे प्रचंड कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या
Virendra Sehwag : बाप बाप असतो! सेहवागशी पंगा घेत होता पाकिस्तानी चाहता, वीरुने सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद
keral : बहीणीच्या लग्नाला बापाने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी बारावीतील मुलगी विकतेय शेंगदाने
BJP : “शिंदे-फडणवीस गुजरातचे एजंट आहे, ते उद्योग प्रकल्पांसाठी मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील”
Narayan Rane : चार आण्याच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो टाकणे पडले महागात