Share

Atharva Sudame : ‘काही लोकं Ai चा वापर करून वाट्टेल ते माझ्या नावानं खपवतायत…’; PMPL वादावर अथर्व सुदामेची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

Atharva Sudame : सोशल मीडियावर हटके रील्समधून तरुणाईचं मनोरंजन करणारा पुण्याचा (Pune) प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे (Atharva Sudame Instagram Reel) एका व्हिडीओमुळे अचानक वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) यांच्या बसमध्ये परवानगीशिवाय चित्रीकरण केल्याचा ठपका ठेवत संबंधित प्रशासनाने त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीत सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्यास सांगत तो व्हिडीओ तात्काळ हटवण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

या प्रकरणात महिला प्रवाशांबाबत आक्षेपार्ह दृश्य दाखवल्याचा आरोप करण्यात आला असून, बससेवेची प्रतिमा मलिन होत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. नोटीस मिळाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा, अफवा आणि बनावट विधानांचा मारा सुरू झाला. अशा पार्श्वभूमीवर आता संबंधित इन्फ्लुएन्सरनं पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे.

सोशल मीडियावर सुरू असलेल्या फेक चर्चांवर नाराजी

इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून त्यानं स्पष्ट केलं की, अनेक न्यूज चॅनेल्स आणि माध्यमं प्रत्यक्ष रील न पाहत मनमानी बातम्या पसरवत आहेत. आपण कुणालाही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसताना, फोटो आणि नावाचा गैरवापर करून विधानं चालवली जात असल्याचं त्यानं सांगितलं. काही लोक AI चा वापर करून खोटे स्टेटमेंट तयार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यानं केला. त्यामुळे अशा कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करत “मला काही बोलायचं असेल, तर ते मी स्वतः माझ्या सोशल मीडियावरूनच बोलेन,” असं ठामपणे नमूद केलं.

नोटीशीत नेमकं काय नमूद आहे?

महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडून बजावलेल्या नोटीशीत, परवानगीशिवाय बसमध्ये चित्रीकरण करणं, प्रवाशांच्या गोपनीयतेचा भंग होणं आणि सार्वजनिक वाहतूक सेवेबाबत चुकीचा संदेश जाणं, हे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. संबंधित व्हिडीओ समाजमाध्यमांवरून तात्काळ हटवण्यात न आल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच तापलं असून, पुढील काही दिवसांत काय भूमिका घेतली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Atharva Sudame First Reaction On PMPL Bus Reel Controversy: 'काही लोकं Ai चा वापर करून वाट्टेल ते माझ्या नावानं खपवतायत...'; PMPL वादानंतर अथर्व सुदामेची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now