Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी धडाकेबाज अपडेट!1500 नाही या महिन्यात 3000 रुपये खात्यात येणार?

Ladki Bahin Yojana: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना या महिन्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Local Body Elections) परिणाम म्हणून डिसेंबर महिन्यात सरकार दोन महिन्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्र जमा करू शकते. यामुळे नियमित 1500 रुपयांच्या जागी थेट 3000 रुपये लाभार्थींना मिळण्याची शक्यता आहे.

डिसेंबरची सुरुवात झाल्यानंतरही अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा सन्माननिधी आला नाही. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, निवडणूक प्रक्रियेच्या कारणामुळे हप्ता उशिरा मिळत असून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे लाभार्थींमध्ये उत्सुकता वाढली आहे, तर काहींना हप्त्याच्या विलंबामुळे चिंता निर्माण झाली आहे.

हप्ता कधी जमा होण्याची शक्यता?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (Local Self-Government Elections) सुरू असल्याने निधीवाटपावर काही तात्पुरते निर्बंध लागले असावेत. यापूर्वी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) दरम्यान दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात आले होते. तज्ञांच्या मते, सरकार पुढील आठवड्यात निधी जमा करू शकते, मात्र अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

सरकारने योजनेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी ई-KYC अनिवार्य केली आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचा सन्माननिधी थांबू शकतो. घरबसल्या ई-KYC करण्याची सोपी प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

  • संकेतस्थळावर जा: ladakibahin.maharashtra.gov.in
  • होमपेजवरील E-KYC पर्यायावर क्लिक करा.
  • आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा.
  • आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्या व OTP निवडा.
  • मोबाईलवर आलेला OTP सबमिट करा…
  • ई-KYC आधीच पूर्ण असल्यास त्याचा संदेश दिसेल.
  • ई-KYC अपूर्ण असल्यास नाव लाभार्थी यादीत आहे का ते तपासता येईल.

जून 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य हेतू महिलांना आर्थिक मदत आणि स्वयंरोजगाराचे प्रोत्साहन देणे हा आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) मार्फत देण्यात येतात. योजना पारदर्शक राहावी म्हणून ई-KYC बंधनकारक ठेवण्यात आली आहे.