Share

Karnataka : इंजिनिअर नवऱ्याचे अनैतिक संबंध, आषाढ उलटला तरी सासरी नेले नाही; मंदिराजवळ बांगड्या-मोबाईल ठेवून विवाहितेने आयुष्य संपवलं

Karnataka : कर्नाटकातील शिवमोग्गा (Shivamogga) जिल्ह्यात घडलेल्या एक धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पालकांनी सरकारी अभियंता म्हणून नोकरी करणारा जावई मिळावा म्हणून मोठ्या उत्साहात लग्न लावलं, भरपूर हुंडाही दिला; पण लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच सासरच्यांची पैशाची लालसा वाढत गेली. या सततच्या छळाला कंटाळून लता (Lata) नावाच्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

भद्रा बलदंडा (Bhadra Canal) कालव्यात उडी घेऊन लताने आयुष्याचा शेवट केला. या घटनेनंतर पती गुरुराज (Gururaj) आणि सासरचे सर्वजण घर सोडून फरार झाले असून, गुरुराजचा मोबाईलही बंद येत आहे. होलेहोन्नूर (Holehonnoor) पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लताच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, विवाहाला एक महिना उलटत नाही तोच तिच्या सासरच्यांनी मोठ्या रकमेसाठी सतत त्रास देणे सुरु केले. फक्त आर्थिक मागणीच नव्हे, तर पती गुरुराजचे इतर महिलांशी संपर्क असल्याची माहितीही उघड झाली. आपल्या नातेवाईक आणि आणखी एका महिलेसोबत गुरुराज चॅटिंग करत असल्याचे लताने आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहून ठेवले आहे.

जून महिन्यात लता आपल्या माहेरी, डी.बी. गावात आली होती. आषाढ महिना संपूनही पतीने तिला परत सासरी बोलावले नाही. या दुर्लक्षामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या लताने आपल्या सुसाईड नोटमध्ये पती गुरुराज, त्याच्या बहिणी नागरत्ना (Nagratna), राजेश्वरी (Rajeshwari), सासू शारदम्मा (Sharadamma) आणि मेहुणा कृष्णप्पा (Krishnappa) यांना थेट जबाबदार धरले आहे.

२३ नोव्हेंबर रोजी सिद्धपुरा (Siddapura) गावाजवळील कालव्याजवळ पोहोचून लताने आपले बांगड्या आणि मोबाईल मंदिराजवळ ठेवले. त्यानंतर कालव्यात उडी घेऊन तिने आयुष्य संपवले. घरी ठेवलेल्या सुसाईड नोटने तिच्या कुटुंबीयांना हादरवून टाकले आहे.

सुसाईड नोटमध्ये लताने लिहिले होत. “मी आता सहन करू शकत नाही. गुरुराज आणि त्याच्या परिवाराकडून मला सतत त्रास दिला जात आहे. मला जगायचं नाही.”

होलेहोन्नूर पोलिसांनी गुरुराज आणि त्याच्या कुटुंबातील इतर आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३०४-ब (हुंडाबळी) आणि ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जोरात सुरू आहे.

 

 

 

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now