Smriti Mandhana Palash Muchhal: भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरलेला असताना शेवटच्या क्षणी हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. मेहंदी, हळद आणि संगीत समारंभ पार पडूनही लग्नाच्या आदल्या रात्री अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला.
पहिली माहिती अशी की, स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने विवाह थांबवावा लागला. मात्र, त्याचवेळी सोशल मीडियावर पलाश मुच्छल यांचे ‘फ्लर्टी चॅट्स’ व्हायरल होताच या नात्याबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या. स्मृतीने पलाशसोबतचे काही फोटो डिलीट केल्यानं या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक नात्यात निर्माण झालेल्या दुराव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सर्व गोंधळाचा परिणाम स्मृतीच्या प्रोफेशनल कामावरही दिसू लागला आहे. लग्नानंतर स्मृतीनं अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती 17’ (Kaun Banega Crorepati 17) च्या खास शूटिंगसाठी हजर राहायचे होते. या भागात विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा गौरव करण्यात येणार होता. मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील तणावामुळे स्मृतीनं शूटिंग रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
या विशेष भागात कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), हरलीन देओल (Harleen Deol), रिचा घोष, शेफाली वर्मा (Shafali Verma), दीप्ती शर्मा , स्नेह राणा (Sneh Rana) आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) उपस्थित राहणार आहेत. मात्र, यादीतून स्मृतीचं नाव गायब आहे यामुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, स्मृतीच्या कुटुंबाकडून अद्याप लग्नाचा नवीन मुहूर्त जाहीर केलेला नाही. स्मृतीचे वडील आता प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातं, पण दोन्ही कुटुंबांकडून विवाहाबाबत कुठलीही नवी माहिती देण्यात आलेली नाही.






