Share

Smriti Mandhana: आधी वडिलांची अन् आता पलाशचीही तब्येत ढासळली; स्मृतीच्या शाही विवाहसोहळ्यात नेमकी काय उलथापालथ झाली?

Smriti Mandhana: सांगली (Sangli) इथं रविवारी दणक्यात सुरू होणारं टीम इंडियाच्या उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिचं लग्न अचानक थांबल्यानं सर्वांना धक्का बसला. वडिल श्रीनिवास मानधना (Srinivas Mandhana) यांची प्रकृती अचानक बिघडली आणि स्मृतीनं एका क्षणात संपूर्ण विधी थांबवण्याचा निर्णय घेतला. ही माहिती तिचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी दिली. त्याचदरम्यान, वर पलाश मुच्छल (Palash Muchhal) यालाही पित्ताचा त्रास वाढून रुग्णालयात न्यावं लागलं. काही तासांतच शाही लग्नाचा माहोल गोंधळात बदलला.

स्मृतीच्या वडिलांना तातडीने सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सांगलीतील समडोळी रोडवरील मानधना फार्महाऊसमध्ये मेहंदी, संगीत समारंभ रंगात आले होते; पण मुख्य लग्नविधी सुरू होण्याआधीच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. डॉक्टरांनी श्रीनिवास यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं.

कार्यक्रमातील गजबजलेले क्षण

लग्नापूर्वीचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. संगीत समारंभात स्मृतीनं पलाशसाठी खास नृत्य केलं होतं. कुटुंबीय, मित्र आणि क्रिकेट क्षेत्रातील सहकारी मोठ्या उत्साहात कार्यक्रमात सहभागी झाले होते. सांगलीमध्ये लग्नासाठी खास सेट तयार करण्यात आला होता.

स्मृती आणि पलाशची प्रेमकहाणी

दोघांची पहिली भेट 2019 मध्ये मुंबईत एका मित्रामार्फत झाली. साध्या मैत्रीपासून सुरुवात झालेलं नातं काही वर्षांत प्रेमात बदललं. 2024 मध्ये त्यांनी सार्वजनिकरित्या त्यांच्या नात्याची घोषणा केली. सहा वर्षांच्या प्रवासानंतर अखेर ते लग्नबंधनात अडकणार होते.

पलाशचं रोमँटिक प्रपोजल

पलाशनं स्मृतीला अत्यंत खास अंदाजात प्रपोज केलं होतं. तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये नेण्यात आलं—जिथं तिनं अलीकडेच टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. तिथेच त्यानं प्रपोज करत आपल्या हातावर ‘SM18’ चा टॅटू काढला होता.

पलाश कोण आहे?

पलाश मुच्छल हे प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचे भाऊ. 2014 मध्ये “ढिशकियां”मधून संगीतकार म्हणून पदार्पण केलं. “पार्टी तो बनती है” आणि “तू ही है आशिकी” यांसारख्या गाण्यांनी त्याला ओळख मिळाली.

एकूण संपत्ती किती?

पलाशची संपत्ती 20 ते 41 कोटींच्या दरम्यान आहे, तर दोघांची एकत्रित संपत्ती 50 ते 75 कोटी मानली जाते. संगीत, चित्रपट आणि लाईव्ह शोमधून त्याची कमाई होते.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now