ISRO SDSC SHAR Recruitment 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सतीश धवन स्पेस सेंटर (Satish Dhawan Space Centre SHAR) मार्फत विविध तांत्रिक व विज्ञान शाखांतील एकूण 141 पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून पूर्ण करावी लागणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सायंटिस्ट, इंजिनियर, टेक्निकल असिस्टंट, फायरमन, ड्रायव्हर अशा विविध श्रेणीतील पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क आणि अर्ज प्रक्रियेचे सर्व तपशील स्पष्टपणे देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या दर्जेदार तांत्रिक संस्थेत काम करण्याची ही उत्तम संधी असून, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये संबंधित नोकरीच्या जागा उपलब्ध असतील.
पदांचे तपशील आणि एकूण पदसंख्या
ISRO SDSC SHAR च्या या भरतीत एकूण 141 जागा उपलब्ध असून त्यांमध्ये खालीलप्रमाणे पदांचा समावेश आहे:
-
सायंटिस्ट/इंजिनियर SC – 23
-
टेक्निकल असिस्टंट – 28
-
सायंटिफिक असिस्टंट – 03
-
लायब्ररी असिस्टंट ‘A’ – 01
-
रेडिओग्राफर – 01
-
टेक्निशियन-B – 70
-
ड्राफ्ट्समन-B – 02
-
कुक – 03
-
फायरमन-A – 06
-
लाईट व्हेईकल ड्रायव्हर ‘A’ – 03
-
नर्स-B – 01
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे:
-
सायंटिस्ट/इंजिनियर SC – M.E/M.Tech/M.Sc (Engg) विविध अभियांत्रिकी शाखा, M.Sc (Atmospheric Science/ Meteorology/ Analytical Chemistry)
-
टेक्निकल असिस्टंट – प्रथम श्रेणी डिप्लोमा (Chemical/Mechanical/Electrical/Electronics/Civil/Computer)
-
सायंटिफिक असिस्टंट – प्रथम श्रेणी B.Sc (Chemistry/Computer Science) किंवा फाईन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्समधील पदवी
-
लायब्ररी असिस्टंट – ग्रंथालय विज्ञानात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
-
टेक्निशियन/ड्राफ्ट्समन/कुक/ड्रायव्हर/फायरमन – 10वी उत्तीर्ण + आवश्यक ITI/अनुभव/परवाने
वयोमर्यादा व शुल्क
-
वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)
-
परीक्षा शुल्क:
-
पद क्र. 1 ते 4 आणि 11 – General/OBC: ₹750
-
पद क्र. 5 ते 10 – General/OBC: ₹500
-
SC/ST/महिला/ExSM/PWD उमेदवारांना शुल्काची संपूर्ण परतफेड
-
अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा
-
अर्ज पद्धत: ऑनलाईन
-
अंतिम तारीख: 21 नोव्हेंबर 2025 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)
-
परीक्षा: दिनांक नंतर जाहीर होईल
-
अधिकृत संकेतस्थळ – https://www.shar.gov.in/sdscshar/index.jsp
-
भरती जाहिरात – येथे क्लिक करा
-
ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा






