Share

Deepak Shirke Expressed Regret: पद्मश्री मिळाला तर, किमान 50 पोलीस तरी अंत्यसंस्काराला येतील; मराठी सिनेसृष्टीतील धडकीभरवणाऱ्या खलनायकाची खंत

Deepak Shirke Expressed Regret : मराठी चित्रसृष्टीतील धडकी भरवणाऱ्या खलनायकांच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेता दीपक शिर्के (Deepak Shirke) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या करिअरबाबत आणि खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने खंत व्यक्त केली आहे. ८०-९० च्या दशकात रुपेरी पडद्यावर दमदार खलनायक साकारून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवणारे शिर्के, मराठीसह (Marathi Movie) हिंदी सिनेमांमध्येही (Hindi Movie) महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. अभिनयाची पार्श्वभूमी नसतानाही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं.

पॉडकास्ट ‘मित्र म्हणे’ मध्ये शिर्के बोलले, “लोकाश्रय मला भरपूर मिळाला, पण राजाश्रय मिळाला नाही. त्या काळात असं वाटायचं की लोकाश्रयच बरा, राजा काय सांगेल हे महत्वाचं नाही. आता मात्र, वय झाल्यानंतर ही गोष्ट मनाला दडलेली आहे. माझ्यामागे एक ६०-६५ वर्षांचा भाऊ आहे आणि आता पुढे कोण असेल? हा प्रश्न नेहमीच राहतो.”

शिर्के पुढे म्हणाले, “मी इतकं काम करूनही पद्मश्री पुरस्कार मिळाला नाही, ही माझी खंत आहे. ही व्यवस्थेची चूक नाही, हे माझं दुर्दैव आहे. पण जर पद्मश्री मिळाला असता, तर किमान ५० पोलीस तरी अंत्यसंस्काराला हजर असते. मी फक्त मनातील भावना व्यक्त केल्या आहेत, वाईट काही नाही.”

या वक्तव्यातून दीपक शिर्के यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या मोठ्या प्रवासातील एक महत्वाची भावना प्रेक्षकांसमोर मांडली आहे, ज्यातून त्यांच्या मेहनतीला मिळालेली मान्यता आणि पद्मश्रीसारख्या पुरस्काराची अपेक्षा अधोरेखित होते.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now