Laxman Hake on Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षण (OBC Reservation) या दोन मुद्द्यांवरून प्रचंड गोंधळ माजलेला आहे. याच वादातून मराठा समाजाचे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) पुन्हा एकदा एकमेकांवर तुटून पडले आहेत.
अलीकडच्या घडामोडीत मनोज जरांगे यांनी सार्वजनिक ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या नावावरून अश्लील हातवारे केले. यावर प्रतिक्रिया देताना हाके संतापले आणि त्यांनी जरांगेंना चांगलेच सुनावले. त्यांनी म्हटलं की, “यातून त्यांची संस्कृती दिसते. जरांगेंनी पाचवीला ॲडमिशन घ्यावं, तिथूनच नागरिकशास्त्र आणि समाजशास्त्र शिकायला मिळेल. ही बोलण्याची भाषा आहे का? कधीतरी विचाराचं उत्तर विचाराने द्यावं लागणार आहे.”
“मराठ्यांचं दुर्दैव की असा नेता मिळाला”
लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगेंसमोर माईक नसेल तर ते अस्वस्थ होतात. कधी ते म्हणतात मी येवल्याचा आहे, कधी फडणवीस यांचा माणूस आहे, असं सतत आरोप करत बसतात. त्यांचं डोकंचं मंडई झालं आहे. एवढंच काय, हाके यांनी थेट त्यांना “हरामखोर” संबोधलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण जरांगेंनी बिघडवलं असल्याचं ठणकावून सांगितलं. “मराठा समाजाला जरांगे सारखा नेता मिळणं हेच समाजाचं दुर्दैव आहे. त्यांच्या भाषेत लोकशाही नाही, हा समाज मागास आहे असंही ते सिद्ध करू शकत नाहीत, कारण आयोग आणि सुप्रिम कोर्ट स्वतः वेगळं सांगत आहेत. त्यांच्याकडे याचं उत्तरच नाही,” असंही हाके म्हणाले.
“कोणत्या आडनावाला करणार चॅलेंज?”
जरांगे समाजातील समान आडनाव असलेल्या लोकांनी नोंदी तपासाव्यात, ही मागणी सतत करत असतात. यावर हाके म्हणाले की, आता मोरे हे आडनाव कधी मराठा, कधी ओबीसी, कधी एससीत दिसतं. मग जरांगे नेमकं कोणत्या आडनावाला चॅलेंज करणार? न्यायमूर्ती पी. व्ही. सावंत, बी. जी. कोळसे पाटील, एन. डी. पाटील यांसारख्या प्रगल्भ व्यक्ती आणि जरांगे यांची तुलना करणं म्हणजे दिवटं उचलल्यासारखं आहे.
ते पुढे म्हणाले की, “यांच्या डोक्यावर इलाज हवा आहे, पहिल्यांदा मानसोपचारतज्ज्ञाकडे दाखवा. महाराष्ट्राचा नाश केल्याशिवाय हे थांबणार नाहीत. 10 टक्के मतं घेऊन ते उड्या मारतायत, पण 90 टक्के लोकं एकत्र आली तर त्यांचं काही खरं नाही. महाराष्ट्राने या माणसाच्या नादाला लागू नये, ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे.”
“शाळेत जाऊन नागरिकशास्त्र शिका”
हाके यांनी आणखी हल्लाबोल करताना म्हटलं की, जरांगेंनी पाचवीला ॲडमिशन घ्यावं, पुढे जाऊन इतिहास, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र शिकावं. “शिवाजी महाराज कोण होते, महाराष्ट्राचं स्वरूप काय आहे, ओबीसी आणि एससी-एसटीचे हक्क काय आहेत, हे शिकल्यानंतरच जरांगेंना वास्तव समजेल. अन्यथा ते फक्त लोकांची दिशाभूल करत राहतील.”