Share

Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match: बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा निशाणा

Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match:  यूएईमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना (India Pakistan Match) उद्या (14 सप्टेंबर) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी करत केंद्र सरकारवर आणि भाजपवर (Bharatiya Janata Party) तीव्र टीका केली आहे.

उद्धव ठाकरें म्हणाले, “आज मी अत्यंत विषण्ण मनाने बोलतो आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे जखमांचे घाव अजूनही भरलेले नाहीत आणि शहीद जवानांचे रक्त सुकलेले नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळणे योग्य नाही.” त्यांनी सांगितले की, पाकिस्तान सातत्याने दहशतवाद पसरवत असून, अशा परिस्थितीत भारताने त्याच्याशी संबंध राखणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरें यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे ही संधी असल्याचे सांगितले आणि सामन्यावर बहिष्कार घालून देशाला योग्य संदेश देण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरें यांनी भाजपने जावेद मियाँदाद (Javed Miandad) यांच्या मातोश्री भेटीवर टीका केली आहे आणि प्रश्न उपस्थित केला, “जर मातोश्रीवर जावेद मियाँदाद येण्यावरून टीका करता, तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायची का? भाजपला तेवढी लायकी आहे का?”

त्यांनी जय शाह (Jay Shah) यांच्यावरही निशाणा साधला. म्हणाले, “उद्या सामना पाहायला जातील, तर त्यांना देशद्रोही म्हणायचं का? भाजप इतकी निर्लज्ज झाली आहे की, सामना सुरू असताना जाहिरातीमध्ये ‘सिंदूर’ दाखवण्यालाही ते कमी पडणार नाही.”

उद्धव ठाकरें म्हणाले की, आगामी आंदोलनाचे शीर्षक आहे “माझं कुंकू, माझा देश”, कारण क्रिकेटमध्ये विकेट गेली तरी दुसऱ्या सामन्यात संधी मिळते, परंतु शहीद जवानांच्या कुटुंबांचे आयुष्य उजाडून जाते. ही व्याख्या भाजपला समजत नाही.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now