Amol Mitkari: राजकारणात क्षणाक्षणाला भूमिका बदलताना दिसते, त्याचं ताजं उदाहरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari NCP MLA) यांनी घातलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar DCM) आणि महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna officer) यांच्यातील व्हिडिओ कॉल वादानंतर मोठा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहून कृष्णा यांच्या शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
मिटकरी यांनी फेसबुकवर लिहिलं की – “सोलापूर घटनेसंदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेतो. ही माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नव्हती. आपल्या पोलीस दलाबद्दल मला सर्वोच्च आदर आहे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी मी सहमत आहे.” अशा शब्दांत त्यांनी स्वतःची भूमिका बदलल्याचं स्पष्ट केलं.
यापूर्वी त्यांनी केलेल्या पत्रात, पूजा खेडकर (Pooja Khedkar case) प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाल्याची शंका व्यक्त केली होती. राज्य सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्वरित चौकशी करावी, असा आग्रह धरला होता.
दरम्यान, या वादाला सुरुवात झाली ती सोलापूर (Solapur city) जिल्ह्यातील कुर्डू गावात (Kurdu village). अवैध मुरुम उत्खननाच्या प्रकरणी अंजना कृष्णा घटनास्थळी दाखल झाल्या आणि स्थानिकांसोबत वाद झाला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला आणि कृष्णा यांच्या हातात दिला. पवारांनी “मी डीसीएम अजित पवार बोलतोय, कारवाई थांबवा, नाहीतर अॅक्शन घेईन” असे सांगताना व्हिडिओ क्लिपमध्ये दिसले. यानंतर हा प्रकार राज्यभर चर्चेचा विषय ठरला.
कोण आहेत अंजना कृष्णा?
-
मूळ केरळच्या त्रिवेंद्रमच्या रहिवासी
-
2023 मध्ये यूपीएससीत 355 वा क्रमांक मिळवत IPS झाल्या
-
सुरुवातीला त्रिवेंद्रममध्ये एसीपी पदावर काम
-
नंतर महाराष्ट्रात बदली होऊन सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
-
प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये SDPO म्हणून काम
-
कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळख
-
करमाळा येथे अवैध व्यवसायाविरोधात मोठ्या कारवाया केल्या
या सर्व घडामोडीनंतर अमोल मिटकरी यांनी मागे घेतलेली भूमिका आणि केलेली दिलगिरी आता चर्चेत आली आहे.
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही.
त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला.#ajitpawar #AnjaliKrishna pic.twitter.com/ag2DNuf3do— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 2, 2025