Pratap Sarnaik Buy First Tesla Car: मुंबई (Mumbai) मध्ये 15 जुलै रोजी टेस्ला (Tesla Car) कंपनीने आपल्या शोरूमचं दिमाखदार लाँचिंग केलं. या उद्घाटनानंतर आजपासून (5 सप्टेंबर) टेस्लाच्या गाड्या ग्राहकांना वितरित केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik Minister) यांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करून इतिहास रचला. प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच ठरवलं होतं की देशातील पहिली टेस्ला कार मीच खरेदी करणार.
प्रताप सरनाईक म्हणाले, “भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली, याचा मला अभिमान आहे. मी कोणतेही डिस्काऊंट न घेता पूर्ण रक्कम भरून ही कार विकत घेतली. विशेष म्हणजे ही कार मी माझ्या मुलासाठी नाही तर नातवासाठी घेतली आहे. तो शाळेत ही कार वापरून पर्यावरणपूरक वाहनांचा संदेश देईल.”
टेस्ला Model Y कार ही जगभरात अत्याधुनिक आणि सुरक्षित इलेक्ट्रिक कार म्हणून ओळखली जाते. यामध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत:
-
Tesla 3 RWD मॉडेल फक्त 5.6 सेकंदात शून्य ते 100 किमी/तास गती गाठू शकते.
-
Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यावर 622 किमी अंतरापर्यंत चालू शकते.
-
स्टँडर्ड RWD व्हर्जन एकदा चार्ज केल्यावर 500 किमी अंतर पार करू शकते.
-
नवीन Model Y मध्ये मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शन दिले गेले आहेत.
-
Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार असून जगभरातही ती टॉप विक्री करणाऱ्या कार्समध्ये येते.
-
Model Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, आणि Mercedes-Benz EQA यांसारख्या कार्सशी होईल.
-
भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) केली जात असल्यामुळे किंमत जास्त आहे.
Model Y RWD आणि LR RWD कारची किंमत आणि रंग:
-
RWD व्हर्जन: ₹61.07 लाख
-
LR RWD व्हर्जन: ₹69.15 लाख
-
स्टेल्थ ग्रे: अतिरिक्त नाही
-
पर्ल व्हाइट मल्टी-कोट: ₹95,000 अतिरिक्त
-
डायमंड ब्लॅक: ₹95,000 अतिरिक्त
-
ग्लेशियर ब्लू: ₹1,25,000 अतिरिक्त
-
क्विक सिल्व्हर: ₹1,85,000 अतिरिक्त
-
अल्ट्रा रेड: ₹1,85,000 अतिरिक्त