Share

Pune Accident : पुण्यात खड्ड्यात घसरली दुचाकी, वृद्ध व्यक्ती खाली पडला आणि कारने चिरडलं; थरार सीसीटीव्हीत कैद

Pune Accident :  पुणे (Pune) शहरातील औंध परिसरातील राहुल हॉटेल (Rahul Hotel) समोर 30 जुलैला घडलेल्या एका भयंकर अपघाताने सर्वांनाच सुन्न करून टाकले आहे. या घटनेत, 61 वर्षीय जगन्नाथ काळे (Jagannath Kale), जे नाबार्डमध्ये (NABARD) रिटायर्ड अधिकारी होते, त्यांचा मृत्यू झाला. ते रस्त्यावरून जात असताना, रस्त्याच्या खड्ड्यातून दुचाकी घसरली आणि मागून आलेल्या कारने त्यांना चिरडले. या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घटनेचा तपशील असं आहे की, जगन्नाथ काळे औंध परिसरातील राहुल हॉटेलच्या समोरून दुचाकीवर जात होते. यावेळी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते खाली पडले. मात्र, त्यांच्यानंतर समोरून आलेल्या कारने त्यांना चिरडले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, स्थानिक नागरिकांनी महापालिकेवर आरोप करत, या खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताला जबाबदार ठरवण्याची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, औंध परिसरात पेव्हिंग ब्लॉक (Paving Block) आणि रस्त्याच्या मध्ये खड्डा निर्माण होतोय, ज्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. या परिसरात आतापर्यंत 7 ते 8 अपघात घडले आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्याचबरोबर, घरातील ज्येष्ठांना बाहेर पाठवताना नागरिकांना चिंता वाटत आहे, असेही ते म्हणाले.

नेमकं काय घडलं?

जगन्नाथ काळे हे औंध परिसरातील राहुल हॉटेल समोरून रस्त्यावर दुचाकी चालवत होते. तेव्हा रस्त्याच्या खड्ड्यातून गाडी घसरली आणि त्यांच्या तोल जाऊन ते खाली पडले. मात्र, त्यांच्यानंतर मागून आलेली कार त्यांना चिरडून गेली, ज्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

स्थानीय नागरिकांनी महापालिकेवर दोषारोप करत, सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी केली आहे. तसेच, या खड्ड्यांच्या कारणाने झालेल्या अपघातांवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now