Pune News : शहरातल्या शिंदेवाडी (Shindewadi) परिसरातील रस्त्यावर घडलेली ही घटना पाहून नागरिक संतापले आहेत. एका तरुणाने आपल्या दुचाकीवर (bike) तरुणीला उलटी बसवून, दोघं मिळून धावत्या वाहनावर प्रेमाच्या उबदार क्षणात रमलेले दिसले. पण त्यांचं हे “प्रेम” अनेकांच्या मनात संताप आणि चिंता निर्माण करणारं ठरलं.
दुचाकीवर तरुणी थेट पेट्रोल टँकवर उलटी बसलेली आणि दुचाकीस्वार शांतपणे वाहन चालवत असलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल (viral) होत आहे. या व्हिडिओत दिसतं की आजूबाजूचे नागरिक त्यांच्याकडे पाहतायत, काही मोबाईलने शूट करतायत, पण त्यांना ना लाज ना भीती जणू रस्ता त्यांच्यासाठी खास आहे!
वाहन चालवताना प्रेमाचा धिंगाणा
या तरुण-तरुणीचं असं सार्वजनिक ठिकाणी, तेही धावत्या वाहनावर एकमेकांना मिठी मारणं, अंग चोळणं, असं वागणं. हे केवळ अश्लीलच नाही तर धोकादायकही आहे. यामुळे केवळ त्यांच्या नव्हे तर इतर वाहनचालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. व्हिडिओमध्ये ही तरुणी आपलं तोंड स्कार्फने झाकलेलं आहे, पण तिच्या कृतीमुळे ओळख लपेल का?
नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून या दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय. “प्रेमाला विरोध नाही, पण कायदा तोडून, इतरांच्या जिवाशी खेळून केलेलं प्रेम हा गुन्हाच आहे,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
मुंबईतही असाच प्रकार; दारूच्या नशेत कारमध्ये धिंगाणा
पुण्यातला प्रकार ताजा असतानाच मुंबई (Mumbai)तील मालाड (Malad) लिंक रोडवर काही दिवसांपूर्वी रात्री कारच्या सनरूफमधून बाहेर येत तरुण-तरुणींनी भर रस्त्यावर धिंगाणा घातला होता. त्या व्हिडिओनंतर बांगुरनगर (Bangur Nagar) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. या तरुण-तरुणींनी दारूच्या नशेत असा प्रकार केल्याचा आरोप आहे.
प्रेम हे सुंदर असतं, पण ते जर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे व्यक्त केलं गेलं की ज्यात इतरांचे प्राण धोक्यात येतात, तर ते प्रेम नव्हे. ती बेजबाबदारपणा आहे. पुण्यातील या दुचाकीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आता वेग घेत आहे.
लोगों का रील का खुमार खत्म ही नहीं हो रहा है, देखिए किस तरह से यह कपल बाइक पर जानलेवा रोमांस कर रहे हैं।
वायरल वीडियो पुणे का बताया जा रहा pic.twitter.com/qdTVIA7l6B
— Priya singh (@priyarajputlive) July 28, 2025






