Beed Crime : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरणाचा तपास आणखी गंभीर वळणावर पोहचला आहे. यातील आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad) याने दाखल केलेला दोषमुक्तीचा (Discharge Application) अर्ज न्यायालयाने थेट फेटाळला आहे. त्यामुळे आता त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे.
या प्रकरणात सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केले आहेत. परिणामी, मुख्य सुनावणीला उशीर होतोय. यावर सरकारी पक्षातर्फे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. “प्रत्येक आरोपी एकामागोमाग एक अर्ज दाखल करत असून यामुळे सुनावणीला उगाचच विलंब होतोय, त्यामुळे न्यायालयाचा वेळ वाया जातोय,” असा युक्तिवाद निकम यांनी मांडला.
याच मुद्द्यावर न्यायालयाने निर्णय देताना, वाल्मिक कराड याचा अर्ज फेटाळून लावला. यामुळे आता त्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे.
दरम्यान, महादेव मुंडे (Mahadev Munde) हत्या प्रकरणाशी संबंधित एक मोठा आरोप समोर आला आहे. विजयसिंह उर्फ बाळा बांगर (Vijaysingh alias Bala Bangar) यांनी दावा केला की, महादेव मुंडे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीचंही खून करण्यात आलाय. आणि या सगळ्यामागे वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांचा आरोप असा की, महादेव मुंडे प्रकरणात जे कोणी पुरावे देण्याची शक्यता आहे, त्यांना संपवण्याचे काम कराड गँग करत आहे. यामुळे या गुन्ह्याची गंभिरता अधिकच वाढली आहे. पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.