Share

Beed News : “कशी आहेस गं बाळा?” म्हणत आईने फोन केला, अन् मुलीने जीव तुटून सांगितलं… सख्ख्या मामानेच…

Beed News :  बीड जिल्ह्यातल्या सिरसाळा (Sirsala) गावातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आलीये. अगं बाळा, कशी आहेस गं? असा साधा प्रश्न विचारणाऱ्या आईच्या फोनमुळे एका अल्पवयीन मुलीच्या व्यथेला वाट मोकळी झाली. आईच्या शब्दांनी तिच्या डोळ्यांतील अश्रू वाहू लागले. आपल्या सख्ख्या मामाकडूनच तिच्यावर अत्याचार झाल्याचा भीषण अनुभव तिने शेवटी उघड केला. बीडच्या (Beed) सिरसाळा (Sirsala) गावात घडलेला हा प्रकार थरकाप उडवणारा आहे.

११ जुलैच्या रात्रीचा काळोख… सिरसाळा (Sirsala) गावातील एका वाड्यात पीडित मुलगी आणि तिचा सख्खा मामा सदरीया आयुब पठाण (Sadriya Ayub Pathan) हे एकत्रच राहत होते. त्या रात्री एक वाजता लघुशंकेसाठी उठलेल्या मुलीला मामा खोलीत बोलावतो आणि मग दरवाज्याजवळ उभी असतानाच तिचा हात धरून ओढून आत नेतो. तिथे तिच्यावर अमानुष अत्याचार करतो. हे कृत्य झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने मुलीने घरच्यांना काहीच न सांगता अंबाजोगाई (Ambajogai) येथे कार्यक्रम आहे, असं कारण सांगून थेट परभणी (Parbhani) गाठलं.

घटनेनंतर अनेक दिवस उलटले. २० जुलै रोजी आईने तिला फोन करून चौकशी केली. “कशी आहेस गं बाळा?”आणि मग तिच्या तोंडून बाहेर आलं सगळं सत्य. पीडितेच्या आईने तात्काळ सिरसाळा पोलीस ठाण्यात (Sirsala Police Station) धाव घेतली आणि आपली तक्रार नोंदवली. पोलीसांनी सदरीया आयुब पठाण (Sadriya Ayub Pathan) या नराधम मामा विरोधात POCSO कायद्यासह इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास महेश टाक (Mahesh Tak) हे पोलीस अधिकारी करत आहेत.

दरम्यान, दुसरी धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यात समोर आली आहे. करंजे (Karanje) परिसरात एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने भरदिवसा चाकू दाखवत शाळकरी मुलीला धमकावलं – “पुण्याला चल, नाहीतर खून करतो.”. हा प्रकार सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला. परिसरातील लोकांनी मध्यस्थी करत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. अखेर जमावाने त्याला पकडून चोप दिला. या प्रकरणात आर्यन वाघमळे (Aryan Waghmale) या तरुणावरही पोक्सो (POCSO) आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now