Share

Narayan Gad: 25 कोटी रुपयांच्या कामासाठी दोघांनी नारायण गडाची बदनामी केली; महंतांचे खळबळजनक आरोप

Narayan Gad: राज्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायण गड (Narayan Gad) वर सध्या वादाचा भडका उडालाय. महंत शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांनी पत्रकार परिषद घेत विश्वस्त बळीराम गवते (Baliram Gavte) आणि भानुदास जाधव (Bhanudas Jadhav) यांच्यावर थेट २५ कोटी रुपयांच्या कामासाठी गडाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. तसेच, पुतळा बसवण्याच्या नावाखाली निधी उभारण्यात आल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

या आरोपांमुळे गड परिसरात खळबळ उडाली असून, दुसरीकडे संबंधित विश्वस्त सदस्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. “ग्रामस्थांनीच उत्तराधिकाऱ्याला विरोध केला होता, त्याचे खापर आम्हा दोघांवर फोडले जात आहे,” असा दावा त्यांनी केला आहे.

“पंधरा दिवस जेवलो, झोपलो का, कुणाला विचार नाही”

महंत शिवाजी महाराज यांनी भावनिक शब्दांत मनातील खदखद व्यक्त करत सांगितले, “पंधरा दिवसांपासून मी न जेवलो, न झोपलो, कुणालाही विचार नाही. मला खूप दु:ख झालंय, मी अशा वातावरणात राहू शकत नाही.” त्यांनी केलेले आरोप स्पष्टपणे सूचित करतात की, गडावर काहीजण हेतुपुरस्सर वातावरण बिघडवत आहेत.

महंतांनी आपल्या नात्यातील संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली होती. मात्र, यावर नाराजी व्यक्त करत काही ग्रामस्थांनी थेट विरोध दर्शवला. त्यामुळे गडावर सुरु असलेला अंतर्गत संघर्ष उफाळून बाहेर आला.

“गड प्रायव्हेट लिमिटेड आहे का?”

विश्वस्त बळीराम गवते यांनी महंतांवर प्रतिउत्तर देत विचारलं, “गड कोणाच्या मालकीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का?” त्यांचं म्हणणं आहे की, महंतांनी एकाच व्यक्तीला गडावर वर्चस्व मिळवून द्यायचं ठरवलंय, त्यामुळे विरोध करणाऱ्यांना दूर करण्याचा हा डाव आहे. आरोप केवळ कुणाच्या सांगण्यावरून केल्याचा दावाही त्यांनी केला.

बीड जिल्हा (Beed District) आणि परिसरातील धार्मिक गड हे भाविकांचं श्रद्धास्थान मानले जातात. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या भगवान गड (Bhagwan Gad) प्रमाणेच नारायण गड, गहिनीनाथ गड, मच्छिंद्रनाथ गड हीही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं आहेत. मात्र अलीकडे या गडांवर राजकीय नेत्यांची उपस्थिती वाढल्याने ते सतत चर्चेत राहू लागले आहेत.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गडावर दसरा मेळावा घेतल्यानंतर या वादाला राजकीय वळण लागल्याचं मानलं जातं. त्यानंतर महंत व विश्वस्त यांच्यातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले आहेत.

गडाच्या विश्वस्त व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, आता भाविकांचे आणि स्थानिकांचे लक्ष या वादाच्या निकालाकडे लागले आहे. महंत आणि विश्वस्तांमधील हा संघर्ष केव्हा आणि कसा थांबेल, हे येणारा काळच ठरवेल.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now