Share

Aaditya Thackeray Vs Nilesh Rane : विधिमंडळात आदित्य ठाकरेंच्या ‘चड्डी बनियन’ टीकेवर निलेश राणे संतापले, म्हणाले- “हिम्मत असेल तर…”

Aaditya Thackeray Vs Nilesh Rane :  राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस राजकीय वादांनी गाजला. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिंदे गटाचे (Shiv Sena – Shinde) आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यात सभागृहात थेट जुंपल्याचे पाहायला मिळाले.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वर्तनाचा संदर्भ देत शिंदे गटाला ‘चड्डी बनियन गँग’ असे संबोधले. यावर निलेश राणे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत ठाकरेंना थेट नाव घेण्याचे आव्हान दिले.

“मुख्यमंत्र्यांवर युतीधर्माची बंधनं”

विधानसभेत भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवत म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना युतीधर्मामुळे अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यांच्यासोबत बसलेले काही लोक ‘चड्डी बनियन गँग’ आहेत – जे कोणालाही मारतात, दहशत निर्माण करतात, पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.”

ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सहनशीलतेचे उदाहरण दिले आहे. पण आता शासनाने ‘चड्डी बनियन गँग’वर कारवाई करून कायदा काय असतो ते दाखवावे.”

“हिम्मत असेल तर नाव घ्या!”

ठाकरेंच्या टीकेनंतर निलेश राणे उभे राहून संतापले. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले– “सभागृहात आपण कोणाबद्दल बोलतो आहोत ते स्पष्ट सांगावे. हे ‘चड्डी कोण आणि बनियन कोण’ हे जनतेला कळले पाहिजे. जर हिंमत असेल तर नाव घ्या, अन्यथा असे शब्द सभागृहाच्या कारवाईत वापरू नयेत.”

ते पुढे म्हणाले, “उगाच सर्वसामान्य सदस्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. जर आक्षेपार्ह भाषा वापरणार असाल, तर तिचा संदर्भही द्या. सभागृहाच्या मर्यादा पाळा.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now