Rahul Valmiki : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर (Bulandshahr) जिल्ह्यातील शिकारपूर (Shikarpur) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा मंत्री राहुल वाल्मिक (Rahul Valmiki) हे एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत स्मशानभूमीमध्ये कारमध्ये आढळून आले. संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
स्मशानभूमीतून व्हिडिओ व्हायरल
ही घटना 11 जुलै रोजी सायंकाळी घडली. स्थानिक नागरिकांनी स्मशानभूमीजवळ एक संशयास्पद कार उभी असल्याचे पाहिले. कारकडे पाहण्यासाठी नागरिकांनी पुढे जाताच, त्यांना धक्कादायक दृश्य दिसले – कारमध्ये राहुल वाल्मिक एका विवाहित महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत होते.
गावकऱ्यांनी पाहताच राहुल कारमधून बाहेर आले आणि लोकांपुढे हात जोडून माफी मागू लागले. व्हिडिओ न काढण्याची विनंती करत त्यांनी “तुमच्या पाया पडतो, जाऊ द्या,” असेही म्हणाले. यावेळी संबंधित महिला पदराआड चेहरा लपवत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते.
राजकीय हेतूने वापर केला जातोय असा आरोप
या प्रकाराचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, राहुल वाल्मिक यांचे वडील म्हणाले की, हा व्हिडिओ सध्याचा नसून जवळपास 5-6 महिन्यांपूर्वीचा आहे. राजकीय हेतूने आणि बदनामीसाठी तो पुन्हा पसरवला जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
हायवेनंतर थेट मसनवाट्यातच नको ते प्रकार; महिलेसोबत रंगेहाथ पकडला भाजप नेता, लोकांना म्हणाला, “तुमच्या पाया पडतो पण…”
पोलिसांकडून तपास सुरू
बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक डॉ. तेजवीर सिंह (Tejveer Singh) यांनी या व्हिडिओविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सदर प्रकाराबाबत कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी सुरू असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.