EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी खातेदारांच्या पीएफ (PF) खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक खातेदारांच्या खात्यात व्याज जमा झाल्याचे दिसून आले आहे. मात्र अजूनही अनेकांना त्यांच्या खात्यात व्याज जमा झाले की नाही, हे तपासण्याची पद्धत माहित नाही.
प्रत्येक महिन्याला पगारातून ईपीएफ (EPF) साठी ठराविक रक्कम कपात होते आणि ती रक्कम संबंधित संस्थेच्या माध्यमातून थेट EPFOकडे जमा केली जाते. ही रक्कम वेळेवर जमा होतेय का, त्यावर किती व्याज मिळालं, हे जाणून घेण्यासाठी ई-पासबुक (E-Passbook) तपासणं आवश्यक आहे.
पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
तुमचं यूएएन (UAN) क्रमांक सक्रिय असणं अत्यावश्यक आहे. यूएएन अॅक्टिव्ह करण्यासाठी खालील प्रक्रिया करा:
-
https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
-
‘Activate UAN’ या पर्यायावर क्लिक करून माहिती भरा आणि तुमचं यूएएन क्रमांक अॅक्टिव्ह करा.
यूएएन सक्रिय झाल्यावर पुढील टप्पे:
-
https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/login या वेबसाईटवर जा.
-
तिथं यूएएन क्रमांक आणि पासवर्ड टाका.
-
लॉगिन केल्यावर ‘View Passbook’ या पर्यायावर क्लिक करा.
-
जर तुम्ही एका कंपनीत काम करत असाल, तर त्या कंपनीचा एकच पासबुक क्रमांक दिसेल. अनेक कंपन्या असतील, तर सर्व संबंधित पासबुक निवडावे लागतील.
-
‘वर्ष’ निवडल्यावर तुम्हाला ‘Download Passbook’ हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही PDF फॉरमॅटमध्ये पासबुक डाऊनलोड करू शकता.
याशिवाय, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की EPFO च्या पोर्टलवरील सर्व सेवा पूर्णतः मोफत (Free Services) आहेत. कोणतीही फी किंवा चार्जेस भरावे लागत नाहीत.