Share

Python : शेतातून अचानक गायब झाला शेतकरी, झोपडीतून आवाज आला, आत डोकावताच उडला थरकाप

Python : इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर (Sulawesi Island) अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. साउथ बुटोन जिल्ह्यातील मजापहित (Majapahit) या गावात ६३ वर्षीय शेतकरी अचानक शेतात काम करत असताना गायब झाला आणि त्याचा मृतदेह २६ फूट लांब विशाल अजगराच्या (Python) पोटातून सापडल्याने गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

शुक्रवारी सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा अनेक तासांनंतरही काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली. याबाबत आपदा व्यवस्थापन एजन्सी (BPBD) चे आपत्कालीन विभाग प्रमुख ला ओडे रिसावाल (La Ode Resawal) यांनी माहिती दिली की, शेताजवळ त्या शेतकऱ्याची मोटरसायकल उभी असल्याचे आढळले. याच परिसरात एका झोपडीशेजारी एक फुगलेला, अस्वस्थ अजगर लोळताना आढळून आला.

पोट चिरताच उलगडले थरकाप उडवणारे वास्तव

गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी अजगराला ठार मारले आणि त्याचे पोट चिरून पाहिले. तेव्हा त्या अजगराच्या पोटातून थेट शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर आल्याचे पाहून सर्वजण स्तब्ध झाले. रिसावाल (Resawal) यांनी सांगितले की, पावसाळ्यात अशा अजगरांचा वावर या भागात वाढतो. पूर्वी प्राण्यांवर हल्ले झाले असले तरी माणसावर हल्ला झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

गावात पसरली भीतीचे वातावरण 

ही धक्कादायक माहिती गाव सुरक्षा अधिकारी सेर्तु डिर्मन (Sertu Dirman) यांनी दिली. मृतदेह मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने तो शेतकऱ्याच्या घरी नेला. संपूर्ण गावात सध्या भीतीचं वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने आता परिसरातील अजगर आणि इतर सापांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची योजना आखली आहे.

विशेष म्हणजे, २०१७ मध्ये सुलबिरो (Sulabiro) गावातही अशीच घटना घडली होती. तेव्हा २५ वर्षीय अकबर (Akbar) या तरुणाचा मृतदेह २३ फूट लांब अजगराच्या पोटातून सापडला होता. या प्रकारामुळे सुलावेसी परिसरातील रहिवासी अधिकच चिंतेत आहेत.

इंडोनेशिया (Indonesia) आणि फिलीपिन्स (Philippines) मध्ये आढळणारे हे अजगर प्रामुख्याने लहान प्राण्यांचा शिकार करतात. मात्र अलीकडील घटनांमुळे माणसांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना निसर्गातील समतोल बिघडल्याचा आणि मानवी वस्तीवरील वन्यजीवांच्या आक्रमकतेचा गंभीर इशारा देत आहे.

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now