Share

Maharashtra Goverment: ‘मेगा भरती’चा बिगुल वाजला, कोणती पदे भरली जाणार? देवेंद्र फडणवीसांची माहिती

Maharashtra Goverment:  राज्य सरकारकडून १५० दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर ‘मेगा भरती’ (Mega Bharti) राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ७ जुलै रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

‘उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर मेगा भरती’ – फडणवीस

देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितले की, सर्व शासकीय विभागांना १५० दिवसांची उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमाची रूपरेषा दिली आहे. यात आकृतीबंधातील सुधारणा, नियुक्ती नियमांचे अद्ययावतीकरण आणि अनुकंपा तत्वावरील १००% भरती यांसारख्या बाबींचा समावेश आहे. या उद्दिष्टांची पूर्तता झाल्यानंतर रिक्त पदांची अचूक माहिती समोर येईल आणि त्यानंतरच मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाईल.

१ लाखांहून अधिक पदांची पूर्वीच भरती

पूर्वी जाहीर केलेल्या ७५ हजार पदांवर भरती जाहीर करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात १ लाखांहून अधिक पदे भरली गेली आहेत, असे फडणवीस म्हणाले. यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील ६८६० कर्मचाऱ्यांना, ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, पण ते २० वर्षांहून अधिक काळ काम करत आहेत, त्यांना अधिसंख्य पद म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया

अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) प्रवर्गासाठी आरक्षित १३४३ पदांपैकी अनेक पदांवर आधीच भरती झाली आहे, आणि उर्वरित पदांसाठी कार्यवाही सुरू आहे. शासन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे प्रमाणपत्र तपासणी सुलभ करण्यासाठी विशेष सचिवांची टीम तयार करत आहे.

सफाई कामगार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातही भरती

सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) यांनी सफाई कामगारांच्या वारसाहक्कावरून भरतीवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता लाड–पागे समिती (Lad–Page Committee) च्या शिफारशीनुसार संबंधित पदे भरण्यात येणार आहेत. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागात अनुसूचित जमातीसाठी राखीव पदांवरही लवकरच भरती करण्यात येईल.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now