Share

Maharashtra Marathi Hindi Language Row: “मराठी माणसाला मेहनत शिकवा” म्हणणाऱ्या अभिनेत्रीचा माज उतरला, नाक घासत मागीतली माफी

Maharashtra Marathi Hindi Language Row:  सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून (Marathi vs Hindi Language Row) मोठा राजकीय आणि सामाजिक वाद पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे  प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल दोन दशकांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्या मेळाव्यातून मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा उंचावला गेला.

मात्र, याच काळात एक वादग्रस्त विधान करून चर्चेत आली आहे वर्सोवा (Versova) येथे राहणारी मराठमोळी अभिनेत्री राजश्री मोरे (Rajshree More). तिनं तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत मराठी समाजावर थेट आरोप केल्यामुळे संतापाची लाट उसळली.

“मराठी माणसाला मेहनत करायला शिकवा”

राजश्री मोरे (Rajshree More) हिनं व्हिडिओमध्ये म्हटलं की, “मराठी माणसांना मेहनत करायला शिकवा… त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्येच तोच ढगळपणा आहे. परप्रांतीयांनी मुंबई (Mumbai – Maharashtra) सोडली, तर मराठी माणूस काही करू शकणार नाही.”

हे विधान ऐकून मराठी मनात संताप उसळला. नेटकऱ्यांनी तिला जोरदार प्रतिक्रीया दिली आणि तिच्यावर टीकेचा भडिमार केला. काही वेळातच व्हिडिओ व्हायरल झाला आणि मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी थेट ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station – Mumbai) तिच्याविरोधात तक्रार दाखल केली.

राजश्री मोरेची माफी

या वाढत्या दबावामुळे राजश्री मोरे हिला अखेर नमते घ्यावं लागलं. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर करत सार्वजनिक माफी मागितली. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, “लढाईमध्ये काहीही ठेवलं नाही… आयुष्य खूपच लहान आहे.” तसंच तिनं वादग्रस्त व्हिडिओही डिलिट केला आणि अधिक कोणतीही टिप्पणी न करण्याचा निर्णय घेतला.

मराठी अस्मितेच्या पार्श्वभूमीवर चिघळलेला मुद्दा

हा वाद फक्त एका अभिनेत्रीपुरता मर्यादित न राहता, राज्यात सुरू असलेल्या त्रिभाषा सूत्र (Trilingual Policy – GR) आणि हिंदी सक्तीच्या चर्चेशी (Hindi Imposition Debate) जोडला गेला. ठाकरे बंधू (Thackeray Brothers – Raj & Uddhav) एकत्र येऊन हिंदी विरोधात आवाज उठवत असताना, मराठी माणसाच्या मेहनतीवर संशय घेणारे वक्तव्य अनेकांना अस्वस्थ करणारं ठरलं.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now