Share

MNS Marathi Language: दुकानदाराने माफी मागितली पण भाजपने मोर्चा काढायला लावला; अविनाश जाधवांचा गंभीर आरोप

MNS Marathi Language: मीरा रोड (Mira Road) येथील शांती पार्क परिसरातील ‘जोधपूर स्वीट्स अ‍ॅन्ड नमकीन’ या दुकानात घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) शहरातील व्यापाऱ्यांनी आज आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी दुकान मालकाला कानाखाली लगावल्याच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, “आज जे घडले, ते उद्या आमच्याही बाबतीत होऊ शकते.” त्यामुळे स्वसंरक्षणाच्या दृष्टीने एकजुट दाखवत त्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. दुकानांवरील शटर खाली राहिल्याने संपूर्ण शहर काही वेळासाठी ठप्प झाले होते.

व्यवसायिकांची रॅली आणि निवेदन

या घटनेच्या निषेधार्थ सेवेन स्कूल, मिरा रोड (पूर्व) (Seven School, Mira Road East) येथून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड (Prakash Gaikwad) यांच्या कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा बसावा यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

 नेमकं काय घडलं?

‘जोधपूर स्वीट्स अ‍ॅन्ड नमकीन’ या दुकानाच्या मालकाने “मराठी भाषा बोलण्याची काय गरज?” असे वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटले. मनसेचे कार्यकर्ते (MNS Workers) यावर आक्षेप घेत दुकानात गेले आणि स्पष्टीकरण मागितले. मात्र त्या व्यापाऱ्याचा मराठी न बोलण्याचा अडमठपणा कायम राहिल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्याच्या कानाखाली लगावली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

मनसेची भूमिका 

या घटनेनंतर आता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) पत्रकार परिषद घेणार आहेत. मनसे याप्रकरणी आक्रमक भूमिका घेते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण व्यापाऱ्यांनी उघडपणे मोर्चा काढल्यामुळे आता ‘मनसे विरुद्ध व्यापारी’ असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे (NCP – Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संतुलित प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “मराठीचा आग्रह महाराष्ट्रात नाही करायचा तर कुठे करायचा? मारहाणीचं समर्थन देत नाही, पण लोकांनी भावना समजून घ्याव्यात,” असा सल्लाही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now