Shefali Jariwala : सिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचा मृतदेह तिच्या अंधेरी (Andheri) येथील घरात आढळून आला. वयाच्या ४२ व्या वर्षी तिचं निधन झालं. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) मृत्यूचे कारण म्हणून सांगण्यात आले, मात्र पोलीस तपासात ती घरीच मृतावस्थेत आढळल्याचं स्पष्ट झालं आहे.
वॉचमनने काय सांगितलं?
सोसायटीतील वॉचमन शत्रुघ्न (Watchman Shatrughan) यांनी सांगितले की, त्या रात्री साडेदहा (10:30 PM) वाजता पराग त्यागी (Parag Tyagi) बाईकवरून घरी आले आणि काही वेळात शेफाली यांना रुग्णालयात नेण्यात आलं. याचदरम्यान आणखी एक व्यक्ती बाईकवरून आला आणि शेफालीच्या निधनाची माहिती दिली.
दोन दिवस आधीपर्यंत शेफाली आणि पराग (Shefali & Parag) सोसायटीत त्यांच्या कुत्र्यासोबत फिरताना दिसले होते. त्यामुळे अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने परिसरात खळबळ उडाली. ती काही दिवसांपासून ब्युटी ट्रीटमेंट घेत
मुंबई पोलीस (Mumbai Police) व फॉरेन्सिक युनिट (Forensic Unit) घटनास्थळी पोहोचले. दोन फॉरेन्सिक युनिट गाड्या घटनास्थळी आल्या, ज्यात एक अजूनही तिथेच होती. कूपर रुग्णालय (Cooper Hospital) येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला.
बेलूव्ह्यू हॉस्पिटल (Bellevue Hospital) येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मात्र, शेफालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलीस विविध शक्यतांचा तपास करत आहेत.
मनोरंजन सृष्टी (Entertainment Industry) मध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली असून, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कांटा लगा (Kanta Laga)’ गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली शेफाली, ‘बिग बॉस (Bigg Boss)’ या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती.






