Kondhwa : देशात युद्धजन्य स्थिती असताना समाजमाध्यमावर *”पाकिस्तान जिंदाबाद”* असे पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील एका *१९ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करून न्यायालयीन कारवाईत पाच दिवसांची पोलिस कोठडी* सुनावण्यात आली आहे.
तरुणीवर राष्ट्रद्रोहाचे आरोप, पोलीस तपासात अनेक गंभीर शक्यता*
कोंढवा पोलिस ठाण्यात *शुक्रवारी रात्री उशिरा सदर तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल* करण्यात आला. तिच्यावर आरोप आहे की, युद्धजन्य पार्श्वभूमीवर समाजात *तेढ निर्माण करणारी आणि देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणारी पोस्ट* तिने इंस्टाग्रामसारख्या समाजमाध्यमावर शेअर केली.
*ही पोस्ट पाकिस्तानी नागरिक किंवा यंत्रणेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, तिचा उद्देश आणि त्या मागील यंत्रणा काय आहेत, याबाबत सखोल तपास सुरू आहे. विशेष म्हणजे ही तरुणी नुकतीच **श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे नातेवाइकांकडे जाऊन परतली* असून, ती तेथे *देशविरोधी काम करणाऱ्या गटांच्या संपर्कात आली होती का, याचाही तपास पोलिस करत आहेत.*
न्यायालयात सादर करताना पोलिसांची विशेष युक्ती; हल्ला टाळण्यासाठी वेषांतराचा वापर*
शनिवारी, आरोपी तरुणीला *प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.* समाजात प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने, *पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आला होता.*
विशेष म्हणजे, *आरोपीवर हल्ला होऊ नये म्हणून पोलिसांनी तीव्र खबरदारी घेत, तिच्यासारखाच पेहराव केलेली महिला पोलीस कर्मचारी न्यायालयात पाठवली.* दोघींची उपस्थिती पाहून न्यायालयाने विचारणा केली असता, महिला कर्मचाऱ्याने आपली ओळख स्पष्ट केली. यानंतरच खऱ्या आरोपीची ओळख उघड झाली आणि तिची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
पोलीस तपासाची गरज; मोबाईल जप्त, श्रीनगर दौऱ्यावर संशय*
सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात सांगितले की,
“ही तरुणी अत्यंत गंभीर गुन्ह्यात अडकली असून तिचा मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून तांत्रिक तपास करावा लागणार आहे. ती श्रीनगर येथील नातेवाइकांकडे जाऊन आली असून, तिथे ती कोणाच्या संपर्कात होती हे तपासण्याची गरज आहे.”
त्यामुळे *तरुणीचा हेतू, कोणत्या यंत्रणा कार्यरत आहेत, आणि अशा प्रकारच्या पोस्ट याआधीही झाल्या आहेत का, याचा शोध घेण्यासाठी **पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी*, अशी मागणी न्यायालयाने मान्य केली.
सामाजिक संघटनांचा संताप; आंदोलक सज्ज*
या प्रकरणामुळे *पुण्यात आणि राज्यभरात सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.* काही संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून, *देशविरोधी वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी* केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून *पोलीस यंत्रणा सतर्क* आहे.
सोशल मीडियावर गैरवापराचं गंभीर उदाहरण*
या घटनेमुळे *समाजमाध्यमांवरील गैरवापराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त* केली जात आहे. युद्धजन्य परिस्थितीत अशा पोस्ट्समुळे *राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सरकारकडून सोशल मीडियावर अधिक बारीक लक्ष ठेवण्याची मागणी* होऊ लागली आहे.
shocking-information-revealed-about-a-young-engineer-from-kondhwa






