Sanjay Bangar : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सध्या कॉमेंट्रीमध्ये कार्यरत असलेले संजय बांगर(Sanjay Bangar) यांची मुलगी अनया बांगर(anya bangar) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिची अलीकडील एक मुलाखत व्हायरल झाली असून त्यात तिने आपल्या वैयक्तिक प्रवासाविषयी आणि क्रिकेट विश्वातील काही अनुभवांबद्दल थेट आणि धक्कादायक खुलासे केले आहेत.
ट्रान्सजेंडर म्हणून आयुष्याची सुरुवात
अनया, जी पूर्वी मुलगा होती, तिने आपले लिंग बदलण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर ती एका मुलापासून मुलीमध्ये रूपांतरित झाली. काही काळ ती लंडनमध्ये राहत होती, जिथे लिंग बदलाशी संबंधित उपचार आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती सध्या पुन्हा भारतात परतली आहे.
क्रिकेटविश्वातील अनुभव आणि आरोप
अनयाने एका मुलाखतीत सांगितले की, आयपीएलमध्ये(ipl) खेळणाऱ्या काही नावाजलेल्या क्रिकेटपटूंनी तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले होते. तसेच, काही जणांनी तिच्याशी संबंध ठेवण्याच्या मागण्या* केल्या होत्या. मात्र, तिने कोणाचेही नाव स्पष्टपणे घेतलेले नाही.
वडील संजय बांगर (sanjay bangar) यांच्याबद्दल सांगितलेले अनुभव
तिने स्पष्ट केलं की, लिंग बदलल्यानंतर वडिलांनी क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला, कारण त्यांना वाटलं की आता महिला क्रिकेटमध्ये तिच्यासाठी जागा नसेल. अनया म्हणाली की, “क्रिकेट माझं जीवन होतं, पण वडिलांनी मला सांगितलं की मी क्रिकेट सोडावं, कारण ट्रान्सजेंडर म्हणून मला संधी मिळणार नाही.”
महिला क्रिकेटमध्ये स्थान न मिळाल्याचं दुःख
अनयाने हेही सांगितलं की, महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना अद्याप संधी मिळत नाही, जरी त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन पातळी सामान्य महिलांप्रमाणेच असली तरी. त्यामुळे तिला या अपुरेपणाची खंत* वाटते.
अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत खेळण्याचा अनुभव
अनया बांगरने आयपीएलमधील काही मोठ्या नावांसोबत, जसे की मुशीर खान, सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल यांच्यासोबत खेळल्याचेही सांगितले.
अनयाच्या या धक्कादायक आणि प्रामाणिक मुलाखतीमुळे सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे. क्रिकेट क्षेत्रातील ट्रान्सजेंडर व्यक्तींप्रती असलेल्या दृष्टीकोनावर आणि समावेशकतेच्या मुद्द्यावर या मुलाखतीने नव्याने प्रकाश टाकला आहे.
sanjay-bangars-daughter-makes-shocking-allegations-against-indian-cricketer