Miss India : ‘माझा पुनर्जन्म झाला तर मला आंबेडकर बनायचंय’, गांगुलीच्या प्रश्नावर मिस इंडिया अभिनेत्रीने दिलं होतं खास उत्तर

Miss India : अभिनेत्री सेलिना जेटली(Celina Jaitley,) हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना खास अभिवादन केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सेलिनाने डॉ. आंबेडकर यांच्याविषयी आपली भावना व्यक्त केली. तिने एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिसते.

गांगुलीने सेलिनाला(Miss India) विचारले होते, “तुला पुन्हा जन्म घ्यायचा झाला, तर कोण म्हणून घ्यायला आवडेल?” यावर उत्तर देताना सेलिना म्हणाली, “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी नेहमीच बोलते आणि त्यांचा सन्मान करते. त्यांच्या विद्वत्तेचा आणि विचारसरणीचा मी खूप आदर करते. त्यांनी भारतातील जातिव्यवस्थेचा नायनाट करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले, सामाजिक सुधारणा घडवून आणल्या आणि भारतीय राज्यघटना तयार केली. जर माझा पुनर्जन्म झाला आणि मी भारताचे संविधान लिहिले, तर लोक मला देखील त्यांच्या प्रमाणे आठवतील.”

हा व्हिडिओ शेअर करताना सेलिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आज आंबेडकर जयंती आहे. माझे दिवंगत वडील आणि आई यांनी आमचं घर डॉ. आंबेडकर नगर (म. प्र.) येथे निवडलं होतं, आणि त्यामुळे मला बाबासाहेबांच्या कार्याशी आणि त्यांच्या वारशाशी जोडले गेल्यासारखं वाटतं.”

व्हिडिओमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora) देखील सेलिनाच्या शेजारी उभी असल्याचं पाहायला मिळतं. सेलिनाने 2001 मध्ये फेमिना मिस इंडिया किताब जिंकला होता आणि त्या वर्षीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती चौथी उपविजेती ठरली होती. ही सेलिनाची अभिव्यक्ती तिच्या सामाजिक जाणिवा आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याप्रती असलेल्या आदरभावनेचं प्रतिबिंब आहे.
miss-india-actress-gave-a-special-answer-to-gangulys-question