स्वयंघोषित संत आसाराम बापूला आसाराम बापूवर त्याच्याच महिला अनुयायीवर बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. गांधीनगर न्यायालयाने या प्रकरणात आसाराम बापूला दोषी ठरवले आहे. २०१३ मध्ये इंदूर मधून आसारामला अटक करण्यात आली होती. तेथून त्याला जोधपूर येथे आणण्यात आले होते.
या प्रकरणात न्यायालयाने आसारामला दोषी ठरवले होते.
२०१३ मध्ये सुरतच्या दोन बहिणींवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात आसारामला गांधीनगर सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. एकेकाळी चहाच्या टपरीवर काम करणारा आसारामला लोक असू मला अशा नावाने हाक मारत असत. तेथून नेमका आसूमलचा आसाराम बाबा कसा झाला, मी एक अनोखी कहानी.
आसाराम चा जन्म नवाबशहा (आता पाकिस्तानमध्ये) बराणी या गावात झाला. १७ एप्रिल १९४२ रोजी थीमल सिरूमलानी आणि मेहगी बा यांच्या घरात आसारामचा जन्म झाला. मात्र त्यावेळी त्याचे नाव आसूमल असे ठेवले होते. फाळणीच्या वेळी आसूमलचे कुटुंबही भारतात स्थलांतरित झाले. स्थलांतरित झाल्यानंतर आसूमलचे कुटुंब अहमदाबाद मधील मणिनगर येथे स्थायिक झाले.
आसूमलच्या वडिलांचे लवकरच निधन झाले. याकारणास्तव त्याच्यावर सर्वच कुटुंबाची जबाबदारी पडली. साधारण १९५८-५९ दरम्यान मेहसाणातील विजापूर जे त्यावेळी ते मोठी मुंबई होते. तेथे आसूमल राहण्यासाठी गेला. गुजरातही याच राज्याचा भाग होता. विजापूर मध्ये दंडाधिकारी कार्यालयासमोर आजही एक चहाचे दुकान आहे जेथे लोक सांगतात की आसूमल तेथे कामाला होता.
या दुकानात काम करण्याच्या वेळेसच त्यांनी लांब दाढी वाढवण्याची सुरुवात केली होती, असे तेथील स्थायिक लोक सांगतात. इतकेच नव्हे तर, १९५९ मध्ये आसूमल आणि त्यांच्या कुटुंबावर दारूच्या नशेतून खून झाल्याचा आरोप होता. परंतु पुराव्या अभावी आसूमलची निर्दोष सुटका झाली होती.
विजापूर सोडून अहमदनगरच्या सरदार नगरमध्ये स्थायिक झाले. तेथील कडूजी ठाकोर दावा करतात की, ते आणि आसुमल एकेकाळी मित्र होते. कडूजी सांगतात की, आसुमल तेव्हा दारूचा व्यवसाय करून त्यातून नफा करायचा.
कडूजी पुढे सांगतात की, आसाराम पांढरा बनयान आणि निळी चड्डी घालून दारूच्या दुकानात दारू घेण्यासाठी येत असे. हे काम सोडल्यानंतर दुधाचा व्यवसाय केला. आणि त्यानंतर मात्र आसूमल गायब झाला.परंतु आसूमलने अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय का घेतला हा मोठा गंभीर प्रश्न आहे.
आसुमलची माझी आई अध्यात्मक वृत्तीची होती. तांत्रिकांच्या संपर्कात आल्यानंतर आसूमलने समोहनाची विद्याही शिकून घेतली. नंतर प्रवचन देण्यासही सुरुवात केली. भक्त आणि गर्दी त्याला बापू म्हणू लागले होते. परंतु मुलगा अध्यात्माकडे वळतोय म्हणून त्याचे लग्न लावण्यात आले.
आसारामच्या वेबसाईट नुसार लग्न करण्यासाठी तो घरातून पळून गेला परंतु शेवटी नतमस्तक होऊन लक्ष्मीबाईची त्याचा विवाह झाला. परंतु अध्यात्माची आवड काही कमी होईना. आसूमल एका गुरुच्या शोधात होता. त्याला लीला बापू शहा यांमध्ये गुरू सापडला. काही काळानंतर आसूमलचे नाव बदलून आसाराम झाले. शेवटी आसाराम अहमदाबादमधील मोटेरा येथे आला.
साबरमतीच्या काठावर कच्चा आश्रम बांधण्यात आला. हळूहळू आसाराम आमच्या प्रवचनांना गर्दी होऊ लागली. भक्त जमा होऊ लागले, एक वेळ अशी आली की भक्तांची गर्दी मावेनाशी झाली. टीव्हीवरही त्याचे प्रवचन लोकप्रिय होऊ लागले. यासह आश्रमांची संख्या देशभरात ४०० वर जाऊन पोहोचली. आणि आसाराम बड्या संतांच्या गटात सामील झाला.
परंतु आता दोन बहिणींवर बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यापूर्वीही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल त्याला शिक्षा झाली आहे. गांधीनगर सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे आसारामच्या शिक्षेत अजूनच वाढ झाली आहे. आता मात्र त्याची सुटका होणं अशक्यच.
महत्वाच्या बातम्या
Asaram Bapu : आसाराम बापूंच्या भक्तांचा पुण्यात मूकमोर्चा, आसाराम बापूंना सोडण्याची मागणी
३ दिवसात ३ लाख कोटींची राख, हिंडेनबर्गने अदानींची दुनियाच हादरवली; श्रीमंतांच्या टॉप टेनमधून बाहेर
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या कलाकाराचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश