आपल्या ग्राहकांना चांगली सर्व्हिस देण्याची जबाबदारी त्या त्या कंपनीची असते. तसेच प्रत्येक कंपनी त्याच दृष्टीने प्रयत्न करत असते.ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato सगळ्यांनाच परिचितच आहे. ऑनलाईन खाद्य पदार्थांची ऑर्डर करण्यासाठी Zomato चा वापर केला जातो.
मात्र या कंपनी संदर्भात काही ना काही तक्रारींचे प्रकार पुढे येतच असता. कधी बिल जास्त,मोठी ऑफर तर कधी डिलिव्हरी बॉयचे गैरवर्तन समोर येते. अशातच आता पुन्हा एकदा Zomato कंपनी चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कोणत्याही मोठ्या सवलतीमुळे नव्हे तर फसवणुकीमुळे.
परंतु यावेळी फसवणुकीचा प्रकार कोणी तिसऱ्या व्यक्ती ने केला नसून डिलिव्हरी करणाऱ्याच व्यक्तीने केले आहे. यासंदर्भात एका तरुणाने दावा केला आहे. त्या तरुणाने सांगितले आहे की त्याला अन्न वितरण करणाऱ्या एजंटने सांगितले की पुढच्या वेळी जेवण ऑर्डर केल्यावर ऑनलाइन पैसे देऊ नका. यासोबतच एजंटने या तरुणाला सांगितले की, झोमॅटो कंपनीकडून सध्या ते कशी फसवणूक करत आहेत.
या तरुणाने लिंक्डइनवर पोस्ट टाकून या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच यासंदर्भात तक्रार देखील केली असून काही प्रश्न विचारले आहे. या पोस्टनंतर झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल यांनी तरुणांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की ते अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
विनय सती नावाच्या तरुणाने हे सगळे प्रकरण उघडकीस आणले आहे. या संदर्भात विनयने सांगितले की जेव्हा डिलिव्हरी एजंटने कंपनीची फसवणूक कशी करायची हे सांगितले तेव्हा त्याला काय करावे तेच समजेना. विनयने पोस्ट करून याबाबत लिहिले आहे.
त्याने पोस्ट मध्ये लिहिले आहे की, काही दिवसांपूर्वी Zomato वरून बर्गर मागवला होता आणि जेव्हा एजंट आला तेव्हा त्याने सांगितले की, “सर, पुढच्या वेळी ऑनलाइन पैसे देऊ नका. पुढच्या वेळी तुम्ही COD (कॅश ऑन डिलिव्हरी) द्वारे ७००-८०० रुपयांचे अन्न ऑर्डर केले की तेव्हा तुम्हाला फक्त २०० रुपये द्यावे लागतील.
मी झोमॅटोला दाखवेन की तुम्ही अन्न घेतले नाही. यानंतर जेवणही उपलब्ध होईल आणि तुम्ही १००० रुपयांच्या जेवणाचा आनंद २०० किंवा ३०० रुपयांमध्ये घेऊ शकता.”
ट्रिक अशी आहे की ऑर्डर कॅन्सल केल्यावर झोमॅटो युजरला २०० रूपये दंड करते. तो डिलीव्हरी एजंट हेच सुचवत होता की तुम्ही ऑर्डर कॅन्सल केली तर तुम्हाला २०० रूपयेच दंड भरावा लागेल. पण तरीही बनवलेले जेवन आमच्याकडेच राहते. ते मी तुम्हाला फुकटमध्ये देईल.
विनयने केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, जेव्हा त्याला हे सगळे एजंटने सांगितले तेव्हा त्याच्याकडे दोन पर्याय होते. एकतर मोफत जेवणाचा आनंद घ्यायचा किंवा कंपनीला तक्रार करायची. परंतु विनयने तक्रार करण्याचा पर्याय निवडला.
तक्रारीसोबतच त्याने कंपनीच्या सीईओला टॅग करून प्रश्न विचारले आहेत. ‘तुम्हाला हे माहित नव्हते आणि तुम्हाला माहित होते तर तुम्ही ते का सोडवले नाही’, असे प्रश्न त्याने विचारले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Hrithik Roshan: विक्रम वेधाच्या टीझरमध्ये ह्रतिक रोशनकडून झाली ‘ही’ मोठी चूक, आमिरलाही पडली होती महागात
Suraj Pawar : फसवणूकीच्या गुन्ह्याबाबत अखेर सैराटफेम प्रिन्सने सोडले मौन; म्हणाला, माझे एवढे धिंडवडे…
Archana Puran : मी अक्षरक्ष: तडफडते आहे, फसवणूक झाल्यासारखं वाटतंय, अर्चना पूरण सिंगने व्यक्त केलं मनातील दुख