खुप प्रतिक्षेनंतर शाहरुख खानचा चित्रपट त्याच्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा ‘पठाण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील गाणेदेखील प्रदर्शित होताच चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.
या चित्रपटातील गाण्यांवरून वाद निर्माण झाले होते. दीपिकाने एका गाण्यात घातलेल्या बिकणीच्या रंगावरून हा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जवळच येत आहे. येत्या २५ जानेवारीला पठाण हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात बघता येणार आहे.
परंतु जेवढी चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे तेवढे वाद देखील अजून वाढत आहेत. अशात या चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली जात आहे. ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसत आहे.
या वादातच भर म्हणून विहिपं नेत्या साध्वी प्राची यांनी ट्विट करत या चित्रपटावर बहिष्कार टाकावा असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे,’पठाण हा चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही, जे करायचे असेल ते करा’, असे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
विहिपं नेत्या साध्वी प्राची यांची पठाण चित्रपटाविरुद्ध ट्विट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याधीही या चित्रपटावर आक्षेप घेतलाच होता. दीपिकाच्या बिकणीच्या रंगावरून हा वाद सुरू झाला आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने ही घातलेली आहे.
या आधीदेखील साध्वी प्राची यांनी ट्विट करत पठाण चित्रपटावर माझ्यासोबत अजून कोण बहिष्कार घालत आहे, असा प्रश्न त्यांनी केला होता. तब्बल ४ वर्षांनी शाहरूख खान या चित्रपटातून कमबॅक करत आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
कसब्याच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपने आखला मास्टर प्लॅन, गोपणीय सर्वेक्षण केले अन्…
पाकिस्तानात सापडला आजवरचा सर्वात मोठा ‘खजिना’, क्षणात संपेल संपुर्ण देशाची गरीबी
शाहरुख खानच्या ‘पठाण’ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केला ‘हा’ विक्रम, कमाईचा आकडा वाचून डोळे फिरतील