नाशिक मतदार संघात पदवीधर निवडणकुणीवरून राजकारणात चांगल्याच घडामोडी घडतांना दिसत आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. अशातच अधिकृतरित्या उमेदवारी दिल्यानंतरही अर्ज न भरल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले आहे.
१८ जानेवरीला झालेल्या एका सभेत सत्यजित तांबे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. नाशिक येथे झालेल्या या सभेत सत्यजित तांबे म्हणाले की, “आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं,” असा गंभीर आरोप त्यांनी या सभेत बोलतांना केला.
किती राजकारण केले जाऊ शकते, हे गेल्या काही दिवसांपासून सर्वांनीच पाहिले. योग्य वेळ आल्यावर आम्ही बोलू, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी केला आहे. बुधवारी झालेल्या नाशिक येथील सभेत बोलतांना त्यांनी यासगळ्या प्रकरणाचा आपले मत मांडले आहे.
या सभेत बोलतांना त्यांनी आमदार कपिल पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच शिक्षक मतदार संघाचे देखील आभार मानले आहे. ज्यावेळी आमच्या कुटुंबावर आरोप करण्यात आले त्यावेळी आमदार कपिल पाटील यांनी स्वतः फोन करून आम्हाला पाठींबा दर्शवला असे त्यांनी सांगितले.
शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक तसेच पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, हा पाठिंबा ते कदापि विसरणार नाहीत, असे त्यांनी यावेळी बोलतांना नमूद केले आहे. मागील “२२ वर्षांपासून मी संघटनेत काम केले आहे. मी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करेन” असा दावा त्यांनी केला आहे.
सत्यजित तांबे यांनी २००० मध्ये एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली. तसेच पुढील १० वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम केलं. युवक काँग्रेसचा राज्याध्यक्ष म्हणून चार वर्षे काम केलं, असं सत्यजीत तांबे यांनी त्यावेळी सांगितले.
अनेक सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांवरही काम तांबे करत आहे. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनात मला पाठिंब्याचं गेल्या अनेक वर्षांपासून होतं असे सत्यजीत तांबे म्हणाले. “देशातील असं एकही राज्य नाही जिथं त्यांनी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं त्यांनी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही”, असे यावेळी तांबे यांनी या सभेदरम्यान सांगितले.
महत्वाच्या बातम्या
पक्षाने निलंबीत करताच सुधीर तांबेंनी दिली पहीली प्रतिक्रीया; काॅंग्रेसलाच खडसावत म्हणाले…
रितेशने मनसे नेत्याच्या मुलालाही लावलं आपल्या गाण्याचं ‘वेड’; खास व्हिडिओ आला समोर
झंझावाती शतकानंतर सूर्याने पुन्हा जिंकले मन, ‘या’ खास व्यक्तीला दिले श्रेय; म्हणाला, ‘ते प्रत्येक वेळी माझी साथ देतात..