शुभमन गिलने शानदार शतकाचे सर्व श्रेय दिले विराटला; सांगीतली ‘ही’ हृदयाला हात घालणारी गोष्ट

भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याने 97 चेंडूत 116 धावांची खेळी केली. गिलचे वनडे कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावले होते.

या शतकानंतर शुभमन गिलने त्याचा सहकारी खेळाडू आणि जागतिक क्रिकेटचा दिग्गज विराट कोहलीला दिलखुलास प्रतिसाद दिला आहे. सलामीवीर शुभमन गिल चांगल्या लयीत दिसत आहे. त्याच्या बॅटमधून एकापाठोपाठ एक मोठे खेळी पाहायला मिळत आहेत. ज्याचा तो पुरेपूर फायदा घेत आहे.

त्याने श्रीलंकेविरुद्ध 97 चेंडूत 116 धावांची खेळी खेळली होती. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक होते. भारताचा डाव संपल्यानंतर बोलताना गिल म्हणाला,

“खूप छान वाटले. जेव्हा तुम्ही सुरुवातीस मोठ्या सुरुवातीमध्ये बदलता तेव्हा ते नेहमीच चांगले असते. आम्ही खरोखर कोणतेही लक्ष्य पाहत नव्हतो, फक्त विकेट कशी घेता येईल हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. जेव्हा तुम्ही रोहित भाऊ किंवा विराट भाऊ यांसारख्या एखाद्यासोबत फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नसते.

विराट कोहलीसोबत फलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या खेळाडूला खूप काही शिकायला मिळते. कारण कोहली नेहमीच नॉन-स्टिक एंडपासून फलंदाजाला मार्गदर्शन करतो. त्यामुळे समोरच्या खेळाडूचे मनोबल वाढते. तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलला कोहलीसोबत फलंदाजीची संधी मिळाली. या खेळीनंतर त्याने विराटचे कौतुक केले आणि म्हटले,

“आम्ही फक्त या गोष्टीवर बोलत होतो की कोणाला लक्ष्य बनवायचे आणि कधी लक्ष्य करायचे यावर बोलत होतो. पहिल्या काही षटकांमध्ये आम्ही जास्त धावा केल्या नाहीत, त्यामुळे आम्ही धावा लवकर करण्याबाबत चर्चा केली. कोहली आश्चर्यकारक आहे, लहानपणी त्याला पाहिल्याचे मला आठवते आणि आज त्याच्यासोबत क्रीज शेअर करताना खूप छान वाटते.

महत्वाच्या बातम्या
विराटला नाही तर ‘या’ खेळाडूला रोहितने ठरवलं मालिकेचा हिरो; सगळ्यांसमोर म्हणाला, तो एक…
शुभमन-विराटने मारली एकमेकांना मिठी, रोहितने सिराजकडे दिली ट्रॉफी; भारताचा सेलिब्रेश व्हिडिओ तुफान व्हायरल
राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचा ठाकरेंना इशारा; काॅंग्रेस राष्ट्रवादीपासूव सावध रहा नाहीतर ते…