Share

‘मला माहितीय कॅन्सर आहे अन् मी ६ महीन्यात मरणार आहे’; पण माझ्या आईवडीलांना हे सांगू नका

आई वडिलांचे आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम आणि तशीच काळजीपण असते. ही एक शास्वत अशी गोष्ट आहे जी कोणीच नाकारू शकत नाही. परंतु एक सहा वर्षांच्या चिमुकल्याने आईवडिलांसाठी डॉक्टरांकडे एक विनंती केली.ही विनंती अशी होती की ती ऐकून डॉक्टरदेखील भावुक झाले.

हैद्राबाद येथील अपोलो रुग्णालयात एका ६ वर्षीय मुलावर कॅन्सर सारख्या आजारावर उपचार सुरू आहेत. जेव्हा या चिमुकल्याला कॅन्सर असल्यावचे डॉक्टरांना कळाले. जेव्हा ही माहिती त्या मुलाला कळाली तेव्हा त्या चिमुकल्याने डॉक्टरांना एक विनंती केली. ती अशी की, त्याला कॅन्सर झाला आहे हे त्याच्या आईवडिलांना सांगू नका.

ही सगळी हकीकत हैद्राबाद येथील डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी ट्विटरवर ट्विट करत सांगितली आहे. मुलाला कॅन्सर झाला आहे हे आईवडिलांना कळाले तर त्यांना दुःख होईल असे त्या मुलाने सांगितले होते असे डॉक्टरांनी सांगितले.डॉ. सुधीर गुप्ता यांनी आपल्या ट्विट मध्ये सांगितले आहे की,

एका सहा वर्षाच्या मुलाने मला सांगितले की,’त्याला ग्रेड ४ चा कॅन्सर झाला आहे. तो केवळ सहा महिनेच आणखी जगेन, हे त्याच्या आईवडिलांना सांगू नका. त्याने या आजाराबद्दल सगळकाही वाचले आहे. त्याला माहिती आहे की तो सहा महिने जगणार आहे पण हे त्यांना सांगू नका. ते त्याच्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे या आजाराबद्दल त्यांना सांगू नका.’

https://twitter.com/hyderabaddoctor/status/1610634845646106624?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1610634845646106624%7Ctwgr%5E1f37d144c64b3afdc563085f44d725ab52f7e687%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Fi-have-cancer-please-dont-tell-my-parents-6-year-old-requests-hyderabad-doctor-heart-touching-story-is-viral-a629%2F

 

ओपीडीमधील एकाच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी त्या मुलाची एकट्यात भेट घेतली. आई वडिलांनी डॉक्टरांना सांगितले की, ‘त्याला कॅन्सर आहे हे त्यांनी त्याला सांगितलेले नाही. आणि आम्हाला हे माहीत आहे हे त्याला सांगू नका’ आणि डॉक्टरांनी तसेच केले. डॉक्टर बोलले की, मनू खुर्चीवर शांत बसला होता आणि त्याचा आत्मविश्वास दिसत होता.

मेडिकलच्या रेकॉर्डनुसार मनूला डाव्या बाजूस ग्लियो ब्लास्टोमामल्टीफॉर्म ग्रेड ४ असल्याचे समजले आहे. यामुळे त्याच्या डाव्या हात-पायाला लकवा झाला आहे. ब्रेन कॅन्सरमुळे त्याचे ऑपरेशन करावे लागले आहे अशी डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या
Vani: तब्बल २ हजार किलोचा शेंदूर हटवला, समोर आले सप्तशृंगी देवीचे मूळ रूप; फोटो पाहून भारावून जाल
हायकोर्टाचा अॅमेझॉनला मोठा दणका, पाकिस्तानमध्ये बनवलेला ‘हा’ पदार्थ भारतात विकण्यास बंदी
प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात केले दाखल; मुलाने दिली ‘ही’ महत्वाची अपडेट

ताज्या बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now