सगळीकडे नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत होता असतांना भोकरदन तालुक्यातील मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पतीनेच त्याच्या पत्नीची हत्या. ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या करण्यात आली आहे.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने नराधम पतीने ट्रॅक्टरखाली चिरडले आणि त्यानंतर या सगळ्या घटनेला अपघाताचा बनाव आणला. या सगळ्या प्रकारची तक्रार मृत महिलेच्या भावाने केली असून पतीविरोद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
हत्या झालेल्या महिलेचे नाव कविता साखळे (वय२९) असं आहे. या सगळ्या प्रकरणात गजानन रघुनाथ आव्हाड याला अटक करण्यात आली आहे. गजानन आव्हाड हा औरंगाबाद महावितरण कार्यालयात कारकून म्हणून कार्यरत आहे असे मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आहे.
तर मृत कविता सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कोतवाल या पदावर कार्यरत होती. गजानन आव्हाड आणि कविता साखळे यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. आव्हाड यांचा कवितासोबतचा तिसरा विवाह होता.
लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर सुखी संसारात भांडणाचा प्रवेश झाला. गजानन आणि कविता यांच्यात सतत भांडण होऊ लागले होते. गजानन कविताला तिच्या माहेरातून पैसे आणण्यासाठी मागे लागला होता. कविताला मारहाणदेखील करण्यात आली होती. या जाचाची तक्रार कविताने पोलिसांत केली होती परंतु नातेवाईकांच्या आग्रहाने तक्रार मागे घेण्यात आली.
तक्रार मागे घेऊन दोघांची समजूत काढून एकत्र राहण्याचा सल्ला दिला होता. ते दोघेही पुन्हा एकत्र राहू लागले होते. यानंतर गजानन आणि कविता यांनी औरंगाबाद शहर सोडले. ते दोघेही हसनाबाद या गावात घर घेऊन राहू लागले होते. परंतु कविताने केलेल्या तक्रारीचा राग आरोपी गजाननाच्या डोक्यात होता.
३१ डिसेंबरला नातेवाईकांकडे जायचे असे सांगून कविताला दुचाकीवर बसवून नेले. याच दरम्यान कोपड शिवरस्त्यावर रात्री साधारण ९-१० च्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. परंतु हा अपघात नसून घातपात आहे असा आरोप मृत कविताच्या भावाने केला आणि तशी तक्रार पोलिसांत केली.
या अपघातात आरोपी गजाननला कुठलीच दुखापत झाली नव्हती पण कविताचा चिरडून मृत्यू झाला आहे. ते ट्रॅक्टर गजाननाच्या नातेवाईकांचेच असल्याने पोलिसांनी भावाने केलेल्या तक्रारीनुसार संशय बाळगून भोकरदन पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच ताबडतोब पोलिसांनी गजानन आणि ट्रॅक्टर चालकाला अटक केली आहे. याच बरोबर मृत कविताची सासू आणि पाच नणंद यांच्याविरोधात शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे हुंडाबळी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास भोरदन पोलीस करत आहे.
महत्वाच्या बातम्या
छाती नाही हालत, मेला वाटतं तो..; पतीचा खुन केल्यावर प्रियकराला फोन, ऑडिओ क्लिपने उलगडले गुढ
प्रेमीयुगुलाचा भयानक स्टंट, धावत्या दुचाकीवरच सुरू केलं…; पोलिसांनी दाखवला हिसका
२८ वर्षांनी काळाने उगवला सूड; तीन चिमुरड्यांसह आईचा खून करुन मुंबईतून पळालेला नराधमाला अटक






