Keshavrao dhondage passes away | राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. ते १०२ वर्षांचे होते. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
उपचार सुरु असतानाच केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. केशवराव हे दिर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले होते. राजकारणात असताना त्यांनी आमदार, खासदार होऊन लोकांच्या समस्या सोडवल्या होत्या. ते त्यांच्या वकृत्वासाठी खुप प्रसिद्ध होते. त्यांची अनेक भाषणे ही चर्चेत असायची.
केशवराव धोंडगे हे एकेकाळी राज्याच्या राजकारणातील खुप महत्वाचे नेते होते. त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता अशी ओळखही मिळाली होती. त्यांची राजकीय कारकिर्द खुप चांगली होती. ते पाच वेळा आमदार तर एकवेळा खासदार झाले होते.
तसेच केशवराव धोंडगे हे मराठवाड्याच्या राजकारणातील महत्वाचा भाग होते. मराठवाड्याची मुलूखमैदानी तोफ म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांचा जन्म हा कंधार तालुक्यातील गऊळ येथे झाला होता. समाजातील प्रश्नांची त्यांना जाणीव होती. त्यामुळे ते प्रश्न मांडण्यासाठी नेहमी पुढे यायचे.
समाजातील प्रश्न सरकारपर्यंत पोहतवण्यासाठी केशवराव धोंडगे यांनी अनेक आंदोलने सुद्धा केली. आमदार-खासदार म्हणून काम करतानाही त्यांनी समाजातील प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं. ते खुप निर्भीड आणि स्वाभिमानी नेते होते.
आणीबाणी लागू केलेली असताना त्यांनी या आणीबाणीला सुद्धा लढा दिला होता. त्यासाठी त्यांना १४ महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यांना नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये टाकण्यात आले होते. तसेच त्यांचे आणि शरद पवारांचे नातेही खुप वेगळे होते.
शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आधी कार्यक्रमात शरद पवारांचा मुका घेतला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार कधी कोणाच्या घरचा माणूस फोडतील याची कुणकुणही लागू देत नाही. नारदही पवारांची बरोबरी करु शकत नाही, अशी टीका त्यांनी कार्यक्रमात केली होती.
महत्वाच्या बातम्या-
शिंदेगटात माजली दुफळी! शिंदेगटातील नेत्यांनीच माझ्याविरूद्ध कट रचलाय; बड्या मंत्र्याचा आरोप
एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार; शिंदे गटातील मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट
jalgaon : जळगावकरांचा नाद करायचा नाय! गोमुत्र पिऊन केले नववर्षाचे दणदणीत अन् खणखणीत स्वागत