भारतीय क्रिकेटमध्ये बदल घडवून आणताना, अष्टपैलू हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे, तर यावर्षी फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करणारा सूर्यकुमार यादवला T20I संघाचा उप-कर्णधार असेल.
सूर्यकुमारने कमी कालावधीत भारतीय क्रिकेटमध्ये खूप यश मिळवले आहे. त्याचे काही शॉट्स असे आहेत की ज्याची कल्पनाही करता येत नाही. विकेटच्या भोवती चौफेर फटके मारण्याची सूर्यकुमारची खासियत त्याला वेगळे करते. सूर्यकुमार वयाच्या 32 व्या वर्षी जगातील नंबर वन T20 आंतरराष्ट्रीय फलंदाज बनला आहे आणि त्याने हा प्रवास खूप वेगाने कव्हर केला आहे.
सूर्यकुमारने 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. आपल्या T20 कारकिर्दीत, सूर्यकुमारने आतापर्यंत 42 सामन्यांच्या 40 डावांमध्ये 44 च्या सरासरीने आणि 180.97 च्या स्ट्राइक रेटने एकूण 1408 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 12 अर्धशतके आणि 2 शतके झळकली आहेत.
40 डावात 131 चौकार आणि 80 षटकार मारणाऱ्या सूर्यकुमारची क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये वैयक्तिक धावसंख्या 117 आहे. विराट कोहली आणि केएल राहुल देखील टी-20 संघात नाहीत आणि 2024 टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून विराट, राहुल आणि रोहित शर्मा यांची या फॉरमॅटमध्ये निवडही होऊ शकत नाही, असे संकेत आहेत.
पहिल्याच मोसमात गुजरात टायटन्सला आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या पंड्याला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यापासून रोहितची जागा घेण्याचा दावेदार मानला जात होता. वेगवान गोलंदाज शिवम आणि मुकेश यांना पहिल्यांदाच टी-20 संघात संधी मिळाली आहे.
रोहितला अंगठाला दुखापत झाल्यापसून अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयने जारी केलेल्या प्रकाशनात हा बदल कायमस्वरूपी आहे की फक्त एका मालिकेसाठी आहे हे सांगण्यात आलेले नाही. वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि मुकेश कुमार यांना पहिल्यांदाच टी-20 संघात संधी मिळाली.
मावीला आयपीएल लिलावात टायटन्सने 6 कोटी रुपयांना, तर मुकेशला दिल्ली कॅपिटल्सने 5.5 कोटी रुपयांना विकत घेतले. रुतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी हे देखील टी-२० संघात आहेत.
श्रीलंकेविरुद्ध भारताचा टी-२० संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग , हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
महत्वाच्या बातम्या
pune : आईवडिलांना घरच्या बाहेर पाठवलं अन् मुलीचे कपडे काढत…; पुण्यात उद्योजकाचं धक्कादायक कृत्य
virat kohli : भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यासाठी विराटने घेतला मोठा निर्णय; BCCI ला सांगीतलं सुद्धा नाही
gautami patil : गौतमी पाटीलची लावणी कायमची बंद पडणार? पहिला कार्यक्रम झाला रद्द; जाणून घ्या नक्की काय घडलं