Share

भारताच्या ‘या’ गोलंदाजाने केला कहर; सलग ८ विकेट घेत विरोधी संघाचा उडवला खुर्दा

team

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. पुढच्या चेंडूवर काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यात घडला. जेव्हा एका 32 वर्षीय गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजीमुळे 8 विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना हिमाचल प्रदेश संघ उत्तराखंडविरुद्ध केवळ 49 धावा करू शकला. त्याबद्दल जाणून घेऊया. हिमाचल प्रदेशचा कर्णधार ऋषी धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय फारसा परिणामकारक ठरला नाही.

जेव्हा हिमाचल संघाची फलंदाजी खराब झाली होती आणि संघाला मिळून केवळ 49 धावा करता आल्या होत्या. हिमाचलकडून अंकित कासेलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 26 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी उत्तराखंडकडून दीपक धापोलाने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आणि 2 विकेट अभय नेगीच्या खात्यात गेल्या.

हिमाचल प्रदेशचा 32 वर्षीय गोलंदाज दीपक धापोलाने किलर गोलंदाजी केली. त्याने 8.5 षटकांत 35 धावा देत 8 विकेट घेतले. त्याने हिमाचलच्या फलंदाजांना क्रिझवर थांबण्याची संधी दिली नाही आणि त्याच्यासमोर हिमाचलची संपूर्ण फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली.

हिमाचल प्रदेशचे ५ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. त्यांच्याशिवाय उर्वरित 5 जणांनी दहाच्या आकड्यालाही स्पर्श केला नाही. 26 धावा करणारा एकच फलंदाज होता.

महत्वाच्या बातम्या
pune : आईवडिलांना घरच्या बाहेर पाठवलं अन् मुलीचे कपडे काढत…; पुण्यात उद्योजकाचं धक्कादायक कृत्य
virat kohli : भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यासाठी विराटने घेतला मोठा निर्णय; BCCI ला सांगीतलं सुद्धा नाही
gautami patil : गौतमी पाटीलची लावणी कायमची बंद पडणार? पहिला कार्यक्रम झाला रद्द; जाणून घ्या नक्की काय घडलं

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now