Share

अश्विनच खरा डाॅन! केल्यात कोहली अन् राहुलपेक्षाही जास्त धावा; सरासरीही दोघांपेक्षा जास्त, पाहा आकडेवारी

2022 हे वर्ष संपणार आहे आणि वर्षाचा शेवट टीम इंडियाने मालिका जिंकून केला आहे. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली. या सामन्याचा हिरो रविचंद्रन अश्विन बनला आहे. या सामन्यातील आपल्या चमकदार कामगिरीने तो यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 भारतीय खेळाडूंमध्ये सामील झाला आहे.

एवढेच नाही तर या काळात त्याची सरासरी धावा टीम इंडियाचा खतरनाक फलंदाज विराट कोहलीच्या तुलनेत सरस ठरल्या आहे. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत अश्विनने 42 धावांची नाबाद खेळी खेळली आणि यावर्षी कसोटीत धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि केएल राहुल यांनाही मागे पाडले.

आपल्या फिरकीवर जगभरातील फलंदाजांना नाचायला लावणारा फिरकी गोलंदाज आर अश्विनने 2022 मध्ये टीम इंडियासाठी 6 कसोटी सामने खेळले आणि 30 च्या सरासरीने 270 धावा केल्या. दुसरीकडे, विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 2022 मध्ये 26.50 च्या सरासरीने एकूण 265 धावा केल्या.

त्याच्याशिवाय टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने 4 सामने खेळले आणि त्याची फलंदाजीची सरासरी 17.12 होती. त्याने एकूण 137 धावा केल्या. 2022 मध्ये, ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. पंतने यावर्षी कसोटी सामन्यात 61.81 च्या सरासरीने फलंदाजी केली आणि 680 धावा केल्या. या वर्षी पंतने 2 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकावली.

दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज श्रेयस अय्यरचे नाव आहे, ज्याने यावर्षी 5 कसोटी सामने खेळले आणि 60.28 च्या सरासरीने 422 धावा केल्या. अय्यरसाठी हे वर्ष खास होते. तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. या वर्षात त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत.

या प्रकरणात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेतेश्वर पुजाराने 5 सामन्यात 45.44 च्या सरासरीने फलंदाजी करत एकूण 409 धावा केल्या. यात पुजाराच्या ३ अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे. अनेक महिन्यांपासून संघाबाहेर असलेला रवींद्र जडेजा या प्रकरणात चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी केवळ 3 सामने खेळले आणि दोन शतकांच्या मदतीने 328 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या
त्याने माझे ब्रेस्ट दाबले, पँटमध्ये हात टाकला अन्…; मराठी अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप
लाइव्ह मॅचमध्ये संतप्त भारतीय फलंदाजाने केले ‘असे’ कृत्य, BCCI करू शकते मोठी कारवाई, करिअरला धोका
ऑपरेशन करताना डॉक्टर नेहमी हिरवा पोशाखच का घालतात? जाणून घ्या खरे कारण…

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now