Share

‘अय्यर-अश्विन अंगार है, बाकी सब भंगार है’; बांगलादेशच्या तोंडातला विजय हिसकावताच चाहत्यांनी केले तुफान कौतूक

बांगलादेश आणि भारत यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने बांगलादेशचा ३ विकेट्सने पराभव करत सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिकाही २-० ने जिंकली. बांगलादेशला भारताने त्यांच्याच घरात हरवल.

बांगलादेशने भारतासमोर दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी 145 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे टीम इंडिया सहजासहजी साध्य करू शकली नाही. एकेकाळी भारताने हा सामना जवळपास गमावल्याचे दिसत होते. पण श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने मिळून संघाला विजय मिळवून दिला.

त्यानंतर आता सोशल मीडियावर दोन्ही खेळाडूंचे जोरदार कौतुक होत आहे. तुम्हाला सांगतो की, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेश 231 धावा करून ऑलआऊट झाला होता. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी 145 धावांची गरज होती.

बांगलादेशच्या फिरकीपटूंनी हे छोटे लक्ष्य भारतीय फलंदाजांसाठी डोंगरासारखे केले. विशेषत: मेहदी हसनने दुसऱ्या डावात 5 विकेत घेतले. एकवेळ भारताचा डाव 74 धावांवर संपुष्टात आला होता. संघाने हा सामना जवळपास गमावला. मात्र यानंतर श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन या दमदार जोडीने खळबळ उडवून दिली.

दोन्ही खेळाडूंनी शेवटपर्यंत टिकून राहून भारताला ३ गडी राखून सामना जिंकून दिला. जिथे अश्विनने 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याचवेळी अय्यरनेही 29 धावा केल्या. मात्र, दोघांच्या मॅचविनिंग इनिंगनंतर आता सोशल मीडियावर चाहते त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत.

https://twitter.com/AdnanAn71861809/status/1606884831941791745?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1606884831941791745%7Ctwgr%5E955105ec6bc6a6207884b11c7203186fbd9ea41d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reaction%2Ffans-on-shreyas-iyer-ashwin%2F

https://twitter.com/Rokum45/status/1606882035435720704?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1606882035435720704%7Ctwgr%5E955105ec6bc6a6207884b11c7203186fbd9ea41d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reaction%2Ffans-on-shreyas-iyer-ashwin%2F

https://twitter.com/imSaber0204/status/1606882035133722624?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1606882035133722624%7Ctwgr%5E955105ec6bc6a6207884b11c7203186fbd9ea41d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reaction%2Ffans-on-shreyas-iyer-ashwin%2F

महत्वाच्या बातम्या
टीम इंडियाची फायनल निश्चीत? जाणून घ्या बांगलादेश मालिकेनंतर कसं बनलय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गणित
subramanyam swami : “शिंदे-फडणवीस सरकार जनतेतून आलेले नाही, फडणवीस जास्त बोलले तर ते उपमुख्यमंत्री राहणार नाही”
Sushma Andhare : “एकनाथ शिंदेंच्या गटातील २० आमदार भाजपात सामील होणार”

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now