गेल्या काही दिवसांपासून तेजस्वीनी पंडित ही चांगलीच चर्चेत आहे. तिने आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतीची तिची अथांग ही वेबसिरीज आली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी आलेल्या रानबाजार या वेबसिरीजमुळेही ती चांगलीच चर्चेत आली होती.
रानबाजार या वेबसिरीजमध्ये तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत होती. आता ती अंथागमुळे चर्चेत आली आहे. ती रोज वेगवेगळ्या पोस्ट करत आहे. अशात तेजस्विनीने तिचा एक अनुभव शेअर केला आहे. तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
अथांग या वेबसिरीजच्या निमित्ताने तेजस्विनीने एक मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. आपल्याला एका नगरसेवकाने ऑफर दिल्याचा धक्कादायक खुलासा तेजस्विनी पंडितने केला आहे. तिच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मी सिंहगड रोडला राहायचे. त्यावेळी मी नगरसेवकाच्या एका घरी भाड्याने राहत होते. एकदा घराचे भाडे देण्यासाठी मी नगरसेवकाच्या ऑफिसला गेली होती. त्यावेळी लोक आपल्या क्षेत्राकडे कसे बघतात? हे मला कळले, असे तेजस्विनीने म्हटले आहे.
मी घरभाडे द्यायला गेले तेव्हा नगरसेवकाने मला थेट ऑफरच दिली. त्यावेळी तिथे एक पाण्याचा ग्लास होता आणि मी त्याच ग्लासातले पाणी त्या व्यक्तीच्या तोंडावर फेकले. मी अशा गोष्टी करण्यासाठी इथे आलेली नाही. नाहीतर मी भाड्याने कशाला राहिले असते, असे तिने म्हटले आहे.
तसेच तिने सांगितले की, कलाविश्वात मला अशा पद्धतीने पैसे कमवायचे असते, तर मी गाड्या घरं अशा अनेक गोष्टी घेतल्या असत्या. तुम्ही कलाक्षेत्रात जेव्हा काम करत असतात, तेव्हा अशा अनेक गोष्टी घडत असतात. पण या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी नवीन शिकायला मिळत असते.
महत्वाच्या बातम्या
argentina : ३६ वर्षांचा दुष्काळ अखेर मेस्सीने संपवला, अर्जेंटिनाला पुन्हा बनवलं विश्वविजेता
tejwini pandit : मी नगरसेवकाला भाड्याचे पैसे द्यायला गेले अन् त्याने…; तेजस्विनी पंडितने केला धक्कादायक खुलासा
पोलिस म्हणाले ‘तुमच्या हाॅटेलचा रस्सा चांगला नाही’; भडकलेल्या मालकाने दांडक्याने चोपले