Share

Uttar Pradesh : दुर्दैवी! नवरदेवाला पुष्पहार घालताच वधू स्टेजवरच कोसळली; हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकाकुलात झाले, जेव्हा नवरदेवाला हार घालताना वधूचा मृत्यू झाला. हे प्रकरण मलिहाबाद भागातील भादवाना गावातील आहे. येथे राहणाऱ्या राजपालची मुलगी शिवांगी हिचा विवाह सोहळा सुरू होता. बुद्धेश्वर येथून मिरवणूक आली होती.

लग्नात सहभागी झालेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. लोक जेवण करून वरमाळा सोहळा पाहण्यासाठी स्टेजजवळ गेले. मंचावर वधू-वर समोरासमोर उभे होते. वर विवेकने वधू शिवांगीला हार घातला. यानंतर शिवांगीची वेळ आली होती. शिवांगीने विवेकला पुष्पहार घालताच ती स्टेजवर कोसळली.

तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने शिवांगीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर दुसरीकडे नववधूच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वांनाच धक्का बसला. लग्नसोहळ्यात ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता त्यांच्या आनंदाचे शोकात रूपांतर झाले.

या दु:खद घटनेमुळे आई कमलेश कुमारी, धाकटी बहीण सोनम आणि भाऊ अमित यांच्यासह कुटुंबीयांची प्रकृती बिघडली आहे. वधूच्या मृत्यूने वर विवेकलाही धक्का बसला आहे. यापूर्वी राजस्थानच्या पाली जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली होती. इकडे मेव्हणीच्या लग्नात नाचत असताना तिची बहिणीचा नवरा अचानक स्टेजवर पडला.

त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारणही हृदयविकाराचा झटका होता. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी कॉलनीतील अब्दुल सलीम पठाण नावाच्या तरुणाला एका लग्नात स्टेजवर डान्स करत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि तो तिथेच पडला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

महत्वाच्या बातम्या
“मुजरा महाराज.. आपल्याला वचन देतो की…”, उदयनराजेंचं शिवरायांना भावूक पत्र: वाचा जसंच्या तसं..
Ajay Devgan daughter : अजय देवगणच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबत टाइट ड्रेसमध्ये पार्टी करतानाचे फोटो व्हायरल; पाहून व्हाल हैराण
Haryana : मुलीने केले मुस्लिम मुलाशी लग्न, वडिलांनी जबरदस्ती धर्मांतराचा आरोप लावत केला गुन्हा दाखल

आरोग्य इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now