Share

Tabbu : नागार्जूनच्या प्रेमात वेडी झालेली तब्बू त्याच्यासाठी आयुष्यभर बिना लग्नाची राहीलीय

nagarjuna with tabu

इश्क मे हर किसी को मक्मल जहाँ नही मिलता,
कहीं जमिन तो कहीं आसमा नही मिलता

Tabbu  : ही शायरी बॉलीवूड अभिनेत्री तब्बूच्या आयूष्यावर बरोबर सुट होतो. कारण प्रेमामध्ये तब्बूचे असेच काही झाले आहे. पण तरीही ती आजही बॉलीवूडची सर्वात प्रभावित अभिनेत्री आहे. तब्बू काही अशा कलाकारांपैकी एक आहे जिने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले. पण तब्बूचे आयूष्य मात्र खुप संघर्षांनी भरलेले आहे.(Bollywood actresses, Tabu, Devanand, Nagarjuna)

तब्बूने तिच्या पहिल्याच चित्रपटामध्ये देवानंद यांच्यासोबतकाम केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. ती टॉपची अभिनेत्री बनली. तब्बूने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीला तिचे नाव संजीव कपूरसोबत जोडण्यात आले होते. या दोघांना बघून असे वाटायचे की, हे दोघे लवकरच लग्न करतील. पण तसे झाले नाही.

कारण या कालावधीमध्ये तब्बूला ‘सिसिंद्री’ या तेलगू चित्रपटाची ऑफर आली. तब्बूने चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटामध्ये तब्बूसोबत साऊथ सुपरस्टार नागार्जून मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटाच्या शुटींगवेळी नागार्जून आणि तब्बू एकमेकांसोबत खुप टाईम घालवू लागले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.

तब्बूला भेटण्याअगोदरपासून नागार्जून विवाहीत होते. त्यांना दोन मुले होती. पण तरीही त्यांनी तब्बूची साथ सोडली नाही. नागार्जूनने तब्बूला हैद्राबादमध्ये एक घर गिफ्ट केले होते. तब्बू नागार्जूनच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती, की तिने मुंबईसोडून हैद्राबादमध्ये जावून राहण्यास सुरुवात केली.

नागार्जून आणि तब्बूची लव्ह स्टोरी दहा वर्षांपर्यंत सुरु होती. असे बोलले जात होते की, ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. या दोघांची लव्ह स्टोरी कोणापासूनही लपलेली नव्हती. ही गोष्ट नागार्जूनची पत्नी आमला समजली. त्यानंतर मात्र या लव्ह स्टोरीमध्ये खुप मोठी अडचण निर्माण झाली.

नागार्जून आणि तब्बू यांच्या नात्यामूळे आमला खुप रागात होती. त्यावेळी तिने नागार्जूनसमोर फॅमिली किंवा तब्बू या दोन्हीपैकी एकाला निवडण्यास सांगितले. त्यावेळी मात्र नागार्जून खुप परेशान झाल. कारण नागार्जूनला त्यांच्या परिवाराला सोडायचे नव्हते. त्यामूळे त्यांनी तब्बूला सोडण्याचा निर्णय घेतला. 2006 साली नागार्जून आणि तब्बूचे ब्रेकअप झाले आणि ते दोघे नेहमीसाठी वेगळे झाले.

ब्रेकअपनंतर तब्बूने परत मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबतच तब्बूने आयूष्यात परत कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तब्बूने परत आल्यानंतर आपल्या करिअरवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. हैदर या चित्रपटातून तब्बूने बॉलीवूडमध्ये परत एन्ट्री केली.

त्यानंतर तिने आंधाधून, दे दे प्यार दे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण आजही तब्बू आविवाहीत आहे. असे बोलले जाते की, तब्बू अजूनही नागार्जूनची वाट बघत आहे किंवा तिला आजपर्यंत नागार्जूनसारखी जीनवसाथी मिळालाच नाही.

महत्वाच्या बातम्या
ncp : पवार रुग्णालयात ॲडमीट असतानाच राष्ट्रवादीत खळबळ; दोन जवळच्या व्यक्तींनी सोडली साथ
ambadas danve : अंबादास दानवेंचा खास माणूस एकनाथ शिंदेंनी फोडला; राजकीय समीकरण बदलणार
Mahesh Tilekar : शिवरायांच्या इतिहासातील खोट्या घटना दाखवून लोकांना लुटण्यापेक्षा…; मराठी दिग्दर्शकाने झाप झाप झापले

मनोरंजन ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now