KL Rahul : खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहूलची संघातून होणार हकालपट्टी? द्रविड म्हणाला…

KL Rahul : टी-२० विश्वचषक २०२२ मधील सततच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलवर सध्या टांगती तलवार आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात केएल राहुलला वगळले जाऊ शकते. त्याच्याऐवजी ऋषभ पंतला रोहित शर्मासह प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीची संधी दिली जाऊ शकते, असे मानले जात होते.

मात्र, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुलबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही अपडेट दिली आहे. यावेळी बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, केएल राहुलला टीम इंडियाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि तो २०२२ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल.

पुढे राहुल द्रविड म्हणाले की, ‘आमची सलामी जोडी कोण असेल याबाबत मला आणि रोहितला शंका नाही. केएल राहुल याच्या फलंदाजीत काय क्षमता आहे हे मला माहित आहे. केएल राहुल हा महान खेळाडू आहे, तो जोरदार पुनरागमन करेल याची आम्हाला खात्री आहे.

भारताने टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. मात्र, केएल राहुलची सलग तिन्ही सामन्यात खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्यामुळे चाहते त्याच्यावर चांगलेच संतापले होते. चाहत्यांनी सोशल मीडियावर केएल राहुलचा क्लास घ्यायला सुरुवात केली.

सोशल मीडियावर चाहत्यांकडून केएल राहुलवर प्रचंड टीका करण्यात आल्या. एका नेटकऱ्याने तर केएल राहुलला भारताच्या सर्व फॉरमॅटमधील संघातून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे. तसेच वेगवेगळे ट्विट करून केएल राहुलला प्रचंड ट्रोलही केले गेले.

भारताला उद्या दुपारी १.३० वाजतापासून बांगलादेश विरुद्ध टी-२० विश्वचषक २०२२ चा तिसरा सामना खेळायचा आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, “बांगलादेश हा संघ खूप चांगला आहे आणि आम्ही त्यांना अजिबात हलक्यात घेऊ शकत नाही. चांगले क्षेत्ररक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे आणि यावेळी आम्ही कोणतीही चूक करू शकत नाही.”

महत्वाच्या बातम्या
‘मला वेड्यात काढू शकता पण देवाला नाही’, BCCI ने वारंवार दुर्लक्ष केल्याने खेळाडू संतापला
Jasprit Bumrah: पुन्हा दिसणार बुम बुम बुमराहचा जलवा, ‘या’ दिवशी गाजवणार मैदान, समोर आली मोठी अपडेट
World Cup: पंत की कार्तिक, उद्या बांग्लादेशविरूद्ध कोण खेळणार? राहुल द्रविडच्या उत्तराने सगळेच झाले अवाक 
Virat Kohli: कोहलीच्या बेडरूममधील व्हिडीओ पाहून वरुण धवन, अर्जुन कपूरचाही राग अनावर, म्हणाले..