Share

Ravichandran Ashwin : ‘सर्वांचे खूप धन्यवाद, माझी क्रिकेट कारकीर्द अप्रतिम होती’, अचानक निवृत्तीबद्दल का बोलू लागला अश्विन? वाचा नेमकं काय म्हटलंय..

Ravichandran Ashwin

Ravichandran Ashwin : टी-२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूंमध्ये भारताला विजयासाठी २ धावांची गरज होती. विसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला.

त्यानंतर रविचंद्रन अश्विन खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारताला आता विजयासाठी एका चेंडूत दोन धावांची गरज होती. पण पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद नवाजने चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर टाकला आणि अश्विनने तो सोडला. तो चेंडू वाइड गेला होता.

मोहम्मद नवाजचा तो चेंडू वळला असता तर तो रविचंद्रन अश्विनच्या पॅडला लागला असता. अशा स्थितीत भारताला सामनाही गमवावा लागला असता. तसेच अश्विनच्या म्हणण्यानुसार असे झाल्यास तो निवृत्त झाला असता. अश्विन म्हणाला की, ‘जर नवाजचा तो चेंडू वळला असता आणि माझ्या पॅडला लागला असता तर मी एवढेच केले असते. ड्रेसिंग रूममध्ये येऊन माझे ट्विटर उघडून ट्विट केले असते. “खूप खूप धन्यवाद, माझी क्रिकेट कारकीर्द खूप चांगली होती.”

मोहम्मद नवाजने वाइड चेंडू टाकल्यानंतर भारताला विजयासाठी एका चेंडूवर एक धाव हवी होती. यावेळी शेवटच्या चेंडूत चौकार मारत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव झाला होता.

यावर्षी भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव करून विश्वचषकाच्या स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचे आव्हान होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गुरुवारी सिडनी क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला. या सामन्यातही भारताने विजय मिळवला आहे.

त्यानंतर रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा तिसरा सामना पार पडला. यात मात्र भारताला पराभव पत्करावा लागला. भारताने दक्षिण आफ्रिकेला १३४ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा ५ विकेट्सने पराभव झाला.

महत्वाच्या बातम्या
dinesh kartik : टीम इंडियाला मोठा धक्का, आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ मॅचविनर खेळाडू जखमी
Rohit : पराभवानंतर प्रचंड भडकला रोहीत; ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार, जाहीरपणे काढली खरडपट्टी
IND VS SA : आम्ही स्वताहूनच आफ्रिकेला जिंकण्याची संधी दिली; रोहित शर्माचे सामन्यानंतर धक्कादायक वक्तव्य
ह्रदयाची धडधड वाढवणाऱ्या सामन्यात भारत अखेरच्या षटकात पराभूत, पाकीस्तान विश्वचषकाच्या बाहेर

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now