Share

Hero Splendor : हिरोच्या ‘या’ बाईकने लोकांना लावलय वेड; एका महीन्यात रेकाॅर्डब्रेक विक्री, आकडा ऐकून हैराण व्हाल

Hero Splendor

Hero Splendor : दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवशी लोक अनेक वस्तूंची खरेदी करत असतात. या दिवसांत बाजारात ग्राहकांची चांगलीच रेलचेल असते. विशेषतः या दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली जाते. यावर्षी दिवाळीच्या सीजनमध्ये अनेक लोक नवीन बाइक्स खरेदी करत आहेत.

ग्राहकांकडून हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या मोटरसायकलची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बऱ्याच काळापासून, Hero Splendor Plus ही देशात सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे, कारण ती कमी किमतीत अधिक मायलेजसह येत आहे. यासोबतच Hero HF Deluxe ची मायलेजच्या बाबतीतही चांगली विक्री होते.

यावर्षी हिरो स्प्लेंडर या बाईकला ग्राहकांनी सर्वात जास्त पसंती दर्शवली आहे. ही बाईक यावर्षी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात हिरो कंपनीने या बाईकचे २,९०,६४९ युनिट्स विकले आहेत. तसेच मागच्या वर्षी या बाईकच्या २,७७,२९६ युनिट्सची विक्री झाली होती.

हिरो स्प्लेंडर या बाईकच्या विक्रीत ४.८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये या बाईकच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या बाजारात हिरो स्प्लेंडर प्लस या बाईकची किंमत ७१,१७६ रुपये ते ७५,४४६ रुपये इतकी आहे. या बाइकमध्ये ९७.२ cc इंजिन आहे.

या कंपनीचा दावा आहे की, हिरो स्प्लेंडर प्लसचे मायलेज ६५ ते ८१ kmpl आहे. हिरो स्प्लेंडरने विक्रीच्या बाबतीत अनेक गाड्यांना मागे टाकले आहे. हिरो स्प्लेंडर ही बाईक २,९०,६४९ ग्राहकांनी खरेदी केली आहे.

महत्वाच्या बातम्या
Rishi Sunak : जावई ऋषी सुनक पंतप्रधान बनल्यानंतर सासरे नारायण मूर्तींनी दिली पहीली प्रतिक्रिया, म्हणाले…
bjp : ‘सत्तांतर घडवून आपल्याकडून फार मोठी चूक झाली, मंत्रीपदाची स्वप्न दाखवली गेली, पण…’
MNS: बॅगा भरायच्या आणि लगेच देश सोडून निघायचं; ‘त्या’ मुस्लिमांवर मनसे भडकली
ashish nehra : ब्रिटनचे पंतप्रधान झाले ऋषी सुनक पण ट्विटरवर ट्रेंड झाला आशिष नेहरा; जाणून घ्या यामागचं खरं कारण

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now