Chandrakant Khaire : अब्दुल सत्तारांचा बंदोबस्त करणार, त्यांची सगळी लफडी.., चंद्रकांत खैरेंचा इशारा

Chandrakant Khaire : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील सगळी पिकं वाया गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यानिमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.

पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने ते शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे २४ मिनिटांच्या दौऱ्यात नुकसानीची पाहणी करणार आहे अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच मी ६९ तालुके आणि ९ जिल्हे फिरलो, असेही ते म्हणाले आहेत.

अब्दुल सत्तारांच्या या टीकेला आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, “शेतकरी अगदी हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या बदल्यांमध्येच गुंग आहेत. ते तरी कुठे गेलेत, असे ते म्हणाले.

सत्तारांविषयी बोलताना खैरे म्हणाले की, “अब्दुल सत्तार म्हणतात की, मी ६९ ठिकाणी जाऊन आलो. काय करून आलात? शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला काही मदत मिळत नाही. असं कुठं होईल का?, असे ते म्हणाले आहेत.

तसेच तुम्ही उद्धव ठाकरेंमुळेच निवडून आला आहात. त्यांच्याच हाताखाली काम केलं आहे, हे विसरू नका. साहेब मला कसंही करून निवडून आणा असं म्हणत ते माझ्या आणि उद्धव ठाकरेंच्या पाया पडलेत. आता त्यांना मस्ती येते. ते कधी इकडे तर कधी तिकडे फिरत असतात.

ते अजून कोणत्या पक्षात जाईल ते माहिती नाही. त्यांना म्हणावं जरा थांबा आम्ही तुमचा बंदोबस्त करतो. त्यांची सगळी लफडी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांचा समाचार घेऊ, असे म्हणत चंद्रकांत खैरेंनी अब्दुल सत्तारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : शेवटी उद्धव ठाकरे मोठे नेते, त्यांचं दणक्यात स्वागत करू, शिंदे गटातील नेत्याची धक्कादायक प्रतिक्रिया
BJP : बड्या नेत्याचा भाजपला घरचा आहेर, म्हणाला, २०२४ ला भाजपला महाराष्ट्रात पराभवाला सामोरे जावे लागेल
Har Har Mahadev : रिलीज होण्याआधीच ‘हर हर महादेव’ वादाच्या भोवऱ्यात, चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप
Sarpanch : ग्रामस्थांनी थकबाकी भरावी यासाठी सरपंचाची भन्नाट शक्कल, दिवाळीनिमित्त आणली ‘ही’ खास योजना