Share

Subodh Bhave : सुबोध भावे नागार्जूनला भेटला तेव्हा नागार्जून शिवरायांबद्दल असं काही बोलला की वाचून अभिमान वाटेल

Nagarjuna wealth

Subodh Bhave : सध्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर हा चित्रपट आहे.

‘हर हर महादेव’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे शरद केळकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर व सायली संजीव हे मुख्य भूमिकेत आहेत. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अनेक ठिकाणी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनदेखील सुरू आहे. त्यानिमित्ताने सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन याची ‘हर हर महादेव’ च्या टीमने भेट घेतली. नुकतीच अभिनेता सुबोध भावे याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने या भेटीचे काही फोटो आणि भेटीबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे.

या पोस्टमध्ये सुबोध भावेने लिहिले की, आज ‘हर हर महादेव’ चित्रपट सर्वदूर पोहोचवण्याच्या निमित्ताने, हैद्राबाद येथे तेलगु सुपरस्टार नागार्जुन सर यांची भेट घेतली. त्यांच्या हस्ते चित्रपटाचं तेलगु भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आलं. समस्त तेलगु बंधू भगिनींना त्यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी आणि शिव विचार जाणून घेण्याचे आवाहन केले. ते स्वतः छत्रपतींच्या चरित्राने प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढे त्याने लिहिले की, “हर हर महादेव” च्या संपूर्ण संघाच्या वतीने आम्ही त्यांना सिंहासनारूढ शिवछत्रपतींची मूर्ती भेट म्हणून दिली. मराठी चित्रपट सर्वदूर नेण्याच्या प्रयत्नाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या व लवकरच “हर हर महादेव” चित्रपट तेलगु भाषेत पाहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागार्जुन सर आपले आमच्या तमाम शिव – भक्तांतर्फे आभार मानतो. हर हर महादेव.

सुबोध भावेची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून प्रचंड कमेंट्सही येत आहेत. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट मराठा साम्राज्याच्या इतिहासावर अवलंबून आहे. यात सुबोध भावेने छ्त्रपती शिवाजी महाराजांची तर अभिजीत केळकर याने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे.

महत्वाच्या बातम्या
World Cup: मी लिहून देतो, भारत पाकिस्तानात जाणार नाही, पण पाकिस्तान भारतात येईल, दिग्गज क्रिकेटरचा दावा
VIDEO: काजोलने गरीब मुलांसोबत केलं असं कृत्य, पाहून नेटकरी संतापले, म्हणाले, ‘तु खरी हिरोईन नाहीस’
Madhya Pradesh: ..अन् शेवटी नाईलाजाने मामाने भाचीचा मृतदेह खांद्यावर टाकून नेला, वाचून डोळ्यात येईल पाणी

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now