Udaya Samant : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. अशातच नुकत्याच महाराष्ट्रात 1 हजार 166 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थामधील सर्वात खालची संस्था होय. त्यामुळे या निवडणुकांना एरवी एवढे महत्व दिले जात नाही. या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जातात. यात कोणत्याच राजकीय पक्षाला प्रत्यक्षरित्या भाग घेण्याची परवानगी नसते.
त्यामुळे या निवडणुकांची फारशी चर्चा राज्याच्या राजकारणात होत नसते. पण सध्या महाराष्ट्रातील राजकारण इतकं तापलेले आहे की, साध्या साध्या गोष्टीवरून राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी शोधत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीने ही संधी राजकीय पक्षांना आयतीच मिळाली.
या निवडणुकीत जरी राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी नेते मंडळी आपआपल्या प्रभाव क्षेत्रात स्थानिक पातळीवर निवडणूक लढवतात. यावरूनच त्या नेत्याचा त्या-त्या भागातील प्रभाव दिसून येतो. प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मोठ्या प्रस्थापितांना धक्का बसत असतो.
असाच एक धक्का महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना बसला आहे. त्यांना त्यांचाच गडात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या गडात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. शिंदे गटाला रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पराभवाला सामोरे जावे लागले. हे दोन्ही जिल्हे उदय सामंतांचे गड आहेत.
त्यामुळे या दोन जिल्ह्यातील पराभव हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरगावमध्ये सुद्धा महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलचा विजय झाला. या दोन्ही जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या पॅनेलला विजय मिळवता आला नाही.
महत्वाच्या बातम्या
murji patel : अंधेरी पोटनिवडणूक: अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने दबाव टाकला? मुरजी पटेल म्हणाले, मी पक्षाला..
Pune: पुणेकरांनी वाहतूकीचे नियम मोडले तरी दंड होणार नाही; चंद्रकांत पाटलांचे पोलिसांना स्पष्ट आदेश
election : रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीचाच डंका, सामंतांना धक्का देत मिळवला विजय, वाचा आकडेवारी